Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुरुषांना कर्करोगापेक्षा नपुंसकत्वाची अधिक भीती!

पुरुषांना कर्करोगापेक्षा नपुंसकत्वाची अधिक भीती!

वेबदुनिया

माणसाच्या मानत कोणकोणत्या गोष्टींची भीती असू शकेल हे काही सांगता येत नाही. तरीही सर्वसाधारणपणे मिहलांचा विचार केला तर वाढत्या वयाची भीती त्यांच्या मनात असू शकते. मात्र एका पाहणीत पुरुषांच्या मनातही अशी भीती असते असे दिसून आले आहे. पुरुष सर्वाधिक कुठल्या गोष्टीला घाबरत असतील तर ते आपले पौरुषत्व गमावण्याला!  कर्क रोगापेक्षाही नपुंसकत्वाची भीती पुरुषांना अधिक वाटते, असे या पाहणीत आढळले आहे. अशाच पाच भीतींची ही माहिती....
 
नपुंसकता : विन्स्कोन्सिन युनिव्हर्सिटीतील प्रा. केन रॉबिन्स यांनी केलेल्या पाहणीनुसार पुरुषांना वाढत्या वयाची चिंता सतावू लागते. वाढत्या वयाबोबर आपली कामेच्छा कमी होईल याची काळजी वाटू लागते. कर्करोगापेक्षाही त्यांना नपुंसकत्वाची भीती अधिक भेडसावते. याचे कारण म्हणजे पुरुषांच्या मनात अनेक वेळा सेक्सचेच विचार घोळत असतात. एका ब्रिटिश पाहणीत असे दिसले होते की, सर्वसामान्यपणे एक पुरुष दिवसातून तेरा वेळ सेक्सबाबतचा विचार करतो तर महिला केवळ पाचवेळास असा विचार करतात!



अशक्तपणा : अमेरिकन केरियाट्रिक्स सोसायटी फॉर हेल्थच्या पाहणीनुसार पुरुषांमध्ये वृद्धावस्थेतील विकल अवस्थेचे भय असते. शारीरिक अशक्तपणा,
webdunia
WD
कमजोरीचे भय दहापैकी नऊ व्यक्तींच्या मनात असतो.

पुढे पहा एकटेपणाची भीती!


webdunia
WD


एकटेपणा : न्यूयॉर्कच्या अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी म्हटलआहे की, पुरुषांमध्ये निवृत्तीनंतरचा एकाकीपणा व बेकारीचे भय असते. पुरुष महिलांप्रमाणे कुटुंबात मिसळून राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मानत हे भय अधिक असते.

पुढे पहा निर्भरतेचभीती!


webdunia
WD


निर्भरता : एका अमेरिकन पाहणीनुसार पुरुषांमध्ये वृद्धावस्थेत दुसर्‍यावर निर्भर राहण्याचे, ओझे बनून जीवन कंठण्याचे भय असते. आयुष्यभर आत्मसन्मानाने, अभिमानाने व स्वातंत्र्याने जगल्यावर उतारवयात असे परावलंबत्व येणे त्यांच्यासाठी मोठेच संकट असते.

पुढे पहा मंद स्मरणशक्ती


webdunia
WD


मंद स्मरणशक्ती : मायो क्लिनिकच्या एका पाहणीनुसार उतारवयात होणारे मेंदूचे अल्झायमर्ससारखे आजार पुरुषांसाठी भयावह असतात. आपली स्मरणशक्ती कमी होऊ नये असे त्यांना वाटत असते. अल्झायमरसारख्या आजारांचा धोका महिलांपेक्षा पुरुषांनाच अधिक असतो हे विशेष!

Share this Story:

Follow Webdunia marathi