Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्याला धोका ज्यूसचा

आरोग्याला धोका ज्यूसचा
सध्या ज्यूसप्रेमींची संख्या वाढतेय. बाहेरून येताना एक ग्लास ज्यूस पिऊनच घरी परतणारे अनेकजण पाहायला मिळतात. मात्र आरोग्याच्या दृष्टीनं फळांचे रस घेणं चुकीचं आहे. अलीकडेच केंब्रिजमधील संशोधकांनी याकडे लक्ष वेधलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार फळांच्या रसात साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळेच आरोग्यावर दुष्परिणाम संभवतो. 
 
कोका कोलामधून शर्करा मिळते तेवढीच शर्करा या रसातूनही मिळते. म्हणूनच आरोग्यास धोका संभवतो. फळांचे रस घेण्याऐवजी फळांचे सेवन उपकारक आहे. फळांचा रस आवडत असेल तर त्यात पाणी मिसळून घेणं चांगलं. फळांच्या रसानं एका मिनिटात १५0 कॅलरीज वाढतात. साहजिकच याचा दुष्परिणाम स्पष्ट दिसतो. 
 
फळांच्या रसात फायबरचं प्रमाण नगण्य असतं. केवळ शर्करेचं प्रमाण असल्यामुळे पोषण होत असलं तरी अनावश्यक उष्मांक वाढून चरबी वाढण्यास मदत होते. त्याऐवजी फळं चावून खाल्ल्यास चोथाही पोटात जातो आणि पचनसंस्था सुधारते.

Share this Story:

Follow Webdunia marathi