Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कटू स्मृतींना नष्ट करणारी गोळी

कटू स्मृतींना नष्ट करणारी गोळी
, शुक्रवार, 6 जून 2014 (18:13 IST)
मल्टीपल स्क्लेरॉसिस या विकारावरील औषध म्हणून ओळखली जाणारी गोळी आता वाईट स्मृती मेंदूतून पुसून टाकण्यासाठी वापरता येणार आहे. संशोधकांना असे दिसून आले की, उंदरांना ¨फिंगोलिमॉड हे औषध देण्यात आले असता त्यांच्यात वेदनादायी स्मृती नष्ट झाल्या. हे औषध अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने मान्य केले आहे.

जर या औषधाचा परिणाम माणसावर अशाच पद्धतीने होत असेल तर त्यातून ज्या लोकांच्या पूर्वीच्या काही वाईट किंवा धक्कादायक स्मृती काढून टाकल्या जातात. फिंगोलिमॉड ही गोळी गिलेन्या या नावानेसुद्धा मिळते. रिचमंड येथील व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीच सारा स्पिगेल व त्यांच्या सहकार्‍यांना असे दिसून आले की, यातहिस्टोन डेअरिसिटलाइज या वितंचकाचे काम निष्प्रभ केले जाते.

उंदरांना एका कक्षात घेऊन त्यांच्या पायाला हलकेसे विजेचे धक्के दिले गेले व ते पिंजर्‍यात परत आल्यानंतर त्यांना थिजल्यासारखे झाले व नैराश्य आले. या हालचालविरहित अवस्थेत असलेल्या उंदरांना नंतर ही गोळी दिली असता त्यांच्या कटू स्मृती पुसल्या गेल्या. नेचर न्योरोसान्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi