Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुडघेदुखी रूग्णांसाठी आशेचा किरण...

गुडघेदुखी रूग्णांसाठी आशेचा किरण...
, बुधवार, 18 नोव्हेंबर 2015 (11:39 IST)
आजकाल अनेकांना गुडघेदुखीचा त्रास असतो. गुडघ्यातल्या पेशी मृतवत झाल्याने हा विकार जडतो. गुडघेदुखीमुळे अनेकांना चालणंही अशक्य होऊन बसतं. प्रत्यारोपण हा त्यावरचा एकमेव उपाय ठरतो. मात्र याबाबतचं एक संशोधन अशा रूग्णांसाठी आशेचा किरण ठरू शकतं. अता गुडघ्यावर कोणत्याही शस्त्रक्रियेविना उपचार करणं शक्य होणार नाहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि आआयटीतल्या संशोधकांनी बायो पॉलिमरच्या मदतीने नव्या पेशी तयार केल्या आहेत. या पेशींची पूड तयार करून इंजेक्शनच्या माध्यमातून त्या गुडघ्यात सोडल्या जातील. यामुळे मृत झालेल्या पेशी पुन्हा जिवंत होऊ शकतील.
 
गुडघ्यात काँड्रो साईट नावाच्या सूक्ष्म पेशी असतात. वय वाढू लागलं की या पेशींची संख्या कमी होत जाते. यामुळे गुडघ्यांमध्ये सूज येऊन हाडांमधलं घर्षण वाढू लागतं. चालणं अशक्य होऊन बसतं. गुडघेदुखीचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन बनारस हिंदू विद्यापीठातले प्रो. अमित रस्तोगी आणि आयआयटीतले डॉ. प्रदीप श्रीवास्तव यांनी याबाबत संशोधन केलं. संशोधनानंतर काँड्रो साईट या सूक्ष्म पेशींची संख्या वाढवण्यात आली. या पेशींचा दर्जाही तपासण्यात आला. या पेशींची पूड तयार करून इंजेक्शनद्वारे हे औषध गुडघ्यात पोहोचवण्याचं आव्हान शास्त्रज्ञांपुढे आहे. मृतवत झालेल्या गुडघ्याच्या पेशी इंजेक्शनच्या माध्यमातून पुनरूज्जीवीत करण्याचा प्रयोग 75 ते 80 टक्के यशस्वी झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. शरीरातल्या इतर अवयवांच्या पेशींची पूड तयार करण्याबाबत सध्या संशोधन सुरू असून येत्या वर्षभरात उपचारांसाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध होईल, अशी अपेक्षा डॉ. प्रदीप श्रीवास्तव यांनी व्यक्त केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi