Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाळा व्हायरल फिवरचा धोका

टाळा व्हायरल फिवरचा धोका
, बुधवार, 30 जुलै 2014 (11:54 IST)
पावसाळ्यात सर्दी, डोकेदुखी, बारीक ताप, अंगातली कणकण अशा सर्व तक्रारी जाणवतात. वातावरण बदलल्यामुळे अशा तक्रारी उद्भवणारच असं म्हणून याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र दोन-तीन दिवसानंतरही हा त्रास थांबला नाही तर योग्य औषधोपचार व्हायला हवेत. व्हायरसद्वारे होणारे व्हायरल इन्फेक्शन काही वेळा घातक ठरू शकतात. व्हायरल फिवरची काही लक्षणं आहेत.

तीव्र तापासवे शरीरात वेदना जाणवणे, सांधेदुखी, नाक वाहणे, घशातली खवखव आणि घशात लाल चट्टे पडणे, शरीरावर लालसर व्रण उठणे, चिडचिडेपण जाणवणे आदी लक्षणांवरून व्हायरल फिवर ओळखता येतो.

कधी कधी पीडित व्यक्तीला जुलाब किंवा उलट्यांचा त्रास होतो. तसेच श्‍वास घ्यायला त्रास होतो. अशावेळी या व्यक्तीने त्याचप्रमाणे त्याच्या सहवासातल्या व्यक्तींनी काळजी घ्यायला हवी. रुग्णाने वापरलेले साहित्य दुसर्‍या कोणीही वापरू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi