Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डिप्रेशन रोधक औषधं तुमचं आयुष्य बेरंग करू शकतात

डिप्रेशन रोधक औषधं तुमचं आयुष्य बेरंग करू शकतात
, सोमवार, 18 ऑगस्ट 2014 (16:16 IST)
तणावाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जर औषधांचा वापर करत असाल तर सावधान.. कदाचित ही औषधं तुमचा तणाव कमी करण्यासाठी मदत करत असतील पण तुमचं एकूणच आयुष्य यामुळे प्रभावित होऊ शकतं. एका नव्या अभ्यासामध्ये ही गोष्ट समोर आलीय. 
 
सॅन डिएगो स्थित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या हॅगोप एस. अकिस्कल यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीच्या सेरोटोनिन प्रणालीला प्रभावित करून आपलं काम पार पाडणारी सेलेक्टिव सेरोटोनिन रिअपटेक इनहिविटर्स (एसएसआरआय) औषधं पुरुषांच्या भावनांना प्रभावित करतात. तर ट्रायसायक्लिक तणावरोधक औषधं महिलांच्या भावनांना प्रभावित करतात. अध्ययनाच्या वेळेपर्यंत या दोन औषधांचा पुरुषांवर आणि महिलांवर तुलनात्मक अभ्यास केला गेला. अभ्यासाअंती असंही आढळून आलं की, जे पुरुष एसएसआरआय औषधांचं सेवन करतात, ते आपल्या भावनांना आपल्या जोडीदारसोबतही व्यवस्थित वाटून घेऊ शकत नाहीत. तर दुसरीकडे, ज्या महिला ट्रायसायक्लिक औषधांचं सेवन करतात त्या ट्रायसायक्लिक औषधांचं सेवन करणार्‍या पुरुषांच्या तुलनेत सेक्स लाईफमध्ये अधिक अडचणींना तोंड देतात. अकिस्कल यांच्या म्हणण्यानुसार, साहजिकच तणावाच्या कारणामुळे व्यक्तीची लैंगिक संबंधांमध्ये रुची कमी होते. हा अभ्यास ‘अफेक्टिव डिसऑर्डर’ पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi