Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर आधुनिक उपचार

- डॉ. मोहन थॉमस

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर आधुनिक उपचार
WD
अपुरी झोप, रात्री उशीरापर्यंत काम, पार्टीमुळे झालेले विशेषत: मद्यसेवन करून झालेले जागरण यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात, असा सर्वांचा समज असतो. यापैकी काही किंवा सर्व कारण काळ्या वर्तुळांसाठी कारणीभूत असली तरी काळी वर्तुळे वाढण्यासाठी अजूनही काही घटक कारणीभूत असतात. खरे तर यासाठी विविध घटक कारणीभूत असून त्यात जनुकीय अनुवांशिकतेचाही समावेश आहे. याबाबत जागतिक पातळीवरील प्रसिद्ध कॉस्मॅटिक सर्जन आणि इंसेप्टर कॉस्मॅटिक सर्जरी अण्ड स्किन इंस्टीट्यूटचे संस्थापक डॉ. मोहन थॉमस यांनी काही विशेष टिप्स दिल्या आहेत.


१. डोळ्यांभोवतीच्या भागात त्वचेचा अत्यंत पातळ आणि नाजूक थर असतो. किंबहुना ही शरीराची सर्वात पातळ त्वचा असते. या भागात अत्यंत अत्यंत निमुळत्या रक्तवाहिन्या आणि धमन्या असतात. या धमन्यांमध्ये प्राणवायू युक्त आणि प्राणवायुरहीत रक्त असतं. पातळ त्वचेमुळे गडद रंगाचे रक्त दिसून येते. त्यामुळेच सकाळच्या वेळी काळी वर्तुळे अधिक स्पष्ट दिसतात.
२. लाल रक्तपेशींची या निमुळत्या असलेल्या धमन्यांमधून गळती होते. या लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हे हिमोग्लोबिन शरीराच्या सुरक्षायंत्रणेद्वारे हेमोसिडेरिन या गडद रंगांच्या रंगद्रव्यात विभाजन होते. हे रंगद्रव्य पातळ त्वचेमधून दिसू लागते आणि त्यामुळे काळी वर्तुळे तयार होतात.
३. अलर्जी - यामुळे डोळ्याभोवती सूज येते आणि त्यामुळे कंड सुटते. डोळे पुन्हा पुन्हा चोळल्यामुळे धमन्यांना इजा पोहोचून लाल रक्तपेशींची गळती सुरू होते.
४. अनुवांशिक - काळी वर्तुळे ही कित्येकदा अनुवांशिक असू शकतात. अनुवांशिक असल्यामुळे अशा कुटुंबांतील व्यक्तींमध्ये खूप लवकर काळी वर्तुळे दिसू लागतात.
५. थकवा किंवा अपुरी विश्रांती
६. अपुरे पोषण

काळ्या वर्तुळांवरील उपचार :

कॉस्मॅटिक सर्जरी इन्स्टिट्युटमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर पूर्ण उपचार केले जातात. शस्त्रक्रिया करून आणि विना-शस्त्रक्रिया अशा दोन्ही उपचार पद्धती उपलब्ध आहेत. यातील शस्त्रक्रिया वापरून केलेली उपचार पद्धती आधुनिक आहे.

शस्त्रक्रियेचा वापर करून

स्वत:च्या शरीरातील चरबीचा वापर करून त्या भागात सुधारणा करणे. या पद्धतीमुळे डोळ्यांना उठाव मिळतो ज्यामुळे निओअँजिओजेनेसिस होतो आणि उतीच्या संख्येत वाढ होते. यामुळे डोळ्याभोवतीच्या त्वचेला नैसर्गिक झळाळी, भरीवपणा आणि तेज प्राप्त होते.

चरबी रोपण आणि नॅनो चरबी रोपण एकत्र केले तर उत्तम परिणाम साध्य होतात, कारण ते स्थानिक उतींमध्ये सहज मिसळून जातात. पारंपरिक चरबीचे रोपण आणि नॅनो ग्राफ्ट एकत्र करून तयार केलेल्या या नवीन उपचार पद्धतीचा आम्ही पुरस्कार केला आहे. त्याच रुग्णाच्या शरीरातील मूलपेशींपासून (स्टेम सेल) या चरबीतल्या पेशी तयार करण्यात येतात आणि काळी वर्तुळे असलेल्या ठिकाणी त्यांचे रोपण करण्यात येते. स्टेम सेल (मूलपेशी) आणि इतर वाढीस कारणीभूत असणाऱ्या घटकांमुळे नवीन रक्तवाहिन्या तयार होतात त्यामुळे त्या भागाला गुलाबी झळाळी प्राप्त होते.

विना शस्त्रक्रिया

अ. रासायनिक साली

ब. फ्रॅक्टोरा - एक क्रांतीकारी उपचारपद्धती

क. वाढीसाठी आणि कमतरता भरून काढण्यासाठी फिलर्सचा वापर

Share this Story:

Follow Webdunia marathi