Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमच्या मेंदूत आहे ऑन-ऑफ बटन

तुमच्या मेंदूत आहे ऑन-ऑफ बटन
, बुधवार, 9 जुलै 2014 (17:25 IST)
मनुष्याच्या मेंदूतही ऑन-ऑफ बटन असल्याचा आणि तो शोधून काढल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, या बटनाच्या साहाय्यानं मनुष्याला बेशुद्ध केलं जाऊ शकतं किंवा बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीतही आणता येऊ शकतं. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे डॉ. मोहम्मद कुबैसी आणि त्यांच्या एका टीमला एका रुग्णावर अभ्यास करताना हा शोध लागल्याचं म्हटलंय. मेंदूच्या एका भागातून निघणारे तरंग या रुग्णाला वारंवार झोपण्यासाठी प्रवृत्त करताना आढळले. हे तरंग रोखण्यात आल्यावर हा रुग्ण लगेच जागा झाला परंतु, या दरम्यान काय झालं याची आठवण मात्र या रुग्णाला राहिलेली नव्हती.

मनुष्याचं शुद्धीत असणं किंवा बेशुद्ध अवस्थेत असणं कसं काम करतं हे आतापर्यंत एक रहस्यच आहे. त्यामुळेच, वैज्ञानिकांमध्ये झोप हा एक चर्चेचा विषय बनलाय.. आणि अशाच न्यू सायन्टिस्ट मॅगझीनमध्ये प्रकाशित झालेला हा शोध अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi