Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दमा आजाराची लक्षणे व उपचार

दमा आजाराची लक्षणे व उपचार
दमा आजार झालेल्या व्यक्तींनी प्रथमत: कोणत्याही धार्मिक व अंधश्रद्धांना बळी पडू नये. दमा आजार फक्त नियमित औषधे घेतल्यानेच बरा होतो. प्राथमिक स्तरात दमा असणार्‍या व्यक्ती व लहान मुलांनी दिवसभरात एकदा 'इनहेलर'चा वापर नियमित करावा. दम्याचा अँटॅक आलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे सेवन करावे आणि 'इनहेलर'चा वापर करावा. 'इनहेलर'च्या वापराने ते औषध फक्त फुफ्फुसात जाते, संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होत नाही. 'इनहेलर'बद्दल गैरसमज दूर होणे आवश्यक आहे.
 
दमा आजारावर औषध-गोळय़ांपेक्षा 'इनहेलर' हे जास्त प्रभावी उपचार असून त्याचा नियमित वापर केल्यामुळे साधारण दम्यावर नक्कीच नियंत्रण ठेवता येते. 'इनहेलर'बद्दल रुग्णांमध्ये फार गैरसमज असल्याचे आढळून आले आहे. 'इनहेलर'ची सवय लागल्यास ते शरीराच्या इतर भागांवर अपायकारक असते. शिवाय त्यामुळे इतर आजार बळावण्याच्या गैरसमजुती जनसामान्यांत आढळत असल्यामुळे 'इनहेलर'चा सातत्याने वापर करणे टाळले जाते. अशामुळे दम्याच्या आजारावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.

दमा आजाराची लक्षणे : दम्यामध्ये कोरडा खोकला, तसेच श्‍वास घेताना छातीमध्ये घरघर ऐकू येणे व कफ होणे ही प्राथमिक लक्षणे आढळून येतात. अशी लक्षणे आढळल्यास पी.एफ.टी. रक्त चाचणी करून आजाराचे निदान करता येते.

उपचार : 'इनहेलर'चा दिवसभरात एकदा वापर तसेच औषधसेवनाचा कंटाळा न करणे. दमा झालेल्या रुग्णांनी जेवणात आंबट व थंड पदार्थांचे सेवन टाळावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशी मुर्ग प्याजी