Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दूध प्या, तंदुरूस्त रहा

दूध प्या, तंदुरूस्त रहा
दूध हा संपूर्ण आहार आहे. लहानपणी बाळाचे पोषण आईच्या दूधावरच होत असते. सस्तन प्राण्यांमध्ये जन्मलेल्या प्राण्यांचा आहार दूधच असतो. यावरूनच दूधाची महती कळते. शास्त्रात दूधाला अमृत म्हटले आहे.

साखर घातलेले दूध कफवर्धक, वायूनाशक असते. दूधात शरीराला आवश्यक असणारे सर्वच पोषक घटक व जीवनसत्त्वे आहेत. दूधातून प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, बी-12 व व्हिटॅमिन ए यांचा शरीरास पुरवठा होतो.

दूधापासून ताक, दही, लोणी, खवा, मलई यासारखे पदार्थ बनतात. चहातसुद्धा आपण दूध घालतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कळत नकळत दूध व दूग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो.

दूध लहान बाळाची भूक भागविण्यासोबतच त्याच्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करीत असते. बाळास इतर पोषण द्रव्य पुरविण्यासोबतच त्याची हाडे मजबूत करून शरीराच्या वाढीस उपकारक ठरत असते.

लहान बाळापासून तर साठ वर्षांच्या आजोबांपर्यंत दूध सर्वांसाठीच गुणकारी आहे. दूध तापवून थंड झाल्यावर घट्ट साय धरते. साय शीतल, शक्तीवर्धक व पित्तनाशक असते. बहूतांश ग्रामीण भागात नुकतेच काढलेले धारोष्ण दूध पितात.
परंतु, दूध उकळून पिणे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अधिक हितकारक. गायीचे दूध पचायला म्हशीच्या दूधापेक्षा हलके असते. आजारी व्यक्तीलाही गायीचे दूध पिण्यासाठी देतात. जगात दुधासारखे उत्तम पेय नाही हेच खरे.

Share this Story:

Follow Webdunia marathi