Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पांढरा पाव आरोग्याला उत्तम

पांढरा पाव आरोग्याला उत्तम

वेबदुनिया

WD
पांढर्‍या पावात आरोग्यासाठी आवश्यक असलेली जीवनसत्वे असतात. ती आरोग्यासाठी ‍हितकारक असतात. पावामुळे वजन वाढते हा समज चुकीचा असल्याचा दावा ब्रिटिश संशोधकांनी केला आहे. पांढर्‍यात पावात आरोग्यासाठी आवश्यक असलेली जीवनसत्त्वे असतात. ती आरोग्यासाठी हितकारक असतात. पावामुळे वजन वाढते हा समज चुकीचा असल्याचा दावा ब्रिटिश संशोधकांनी केला आहे.

पांढर्‍या पावात अनेक पोषक द्रव्ये असतात. हा पाव खाऊ नये, अशा कोणत्याही बाबी त्यात आढळल्या नाहीत. पावाबाबत आरोग्यविषयक मोहिमा आणि टीव्ही वाहिन्यांवर आहारतज्ज्ञांकडून करण्यात येत असणार्‍या या टीकेत काही तथ्‍य नसल्याचा दावा आहार संशॅधक डॉ. अ‍ॅनी ओकॉनर यांनी केला आहे. ब्रिटिश न्यूट्रिशन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून पांढर्‍या पावावर संशोधन करण्यात आले. त्या आधारे ओकॉनर यांनी हा दावा केला. पांढर्‍या पावामुळे पोटाचा घेर वाढतो, वजन वाढते आणि अ‍ॅलर्जीची संख्या वाढते हे आधीच सर्व समज चुकीचे असल्याचे संशोधनात आढळले आहे. पावात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. रोजच्या आहारातून पाव दूर होऊ शकत नाही, यामुळे पावाबद्दल असेलेले हे गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे मतओकॉनर यांनी व्यक्त केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi