Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाठदुखी आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करते - सर्व्हे

पाठदुखी आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करते - सर्व्हे
आनंदी आणि सुखी सेक्स जीवनासाठी पाठदुखी आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते, अशा निष्कर्ष लंडनमधील ब्रिटनच्या अभ्यासकांच्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. पाठदुखीचा त्रास हा आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करतो.

सेक्स सर्वेक्षणासाठी २०५६ लोकांचा अभ्यास करण्यात आला. फिमेलफस्ट डॉट को युके (femalefirst.co.uk.) या संकेतस्थळाने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे की, १४ टक्के लोकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या पाठदुखीचा त्रास हा आरोग्यासाठी घातक ठरू लागल्याचे दिसून आले आहे.

सर्वसाधारण १५ टक्के लोकांनी सांगितले, काम करताना पाठदुखी जाणवते. त्यामुळे काम करताना रडू येते, सेक्सबाबतची चर्चा केल्यानंतर पुढे आले की, १२ टक्के लोकांनी पाठदुखीमुळे सेक्स जीवन सुखी होत नसल्याचे याबाबत सहमती दर्शवली. 

पाठदुखीमुळे शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम दिसून येतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा प्रभाव दिसतो. यामुळे आपले दैनंदिन जीवन थोडे कठीण होते. पाठदुखी स्वत:लाच नाही तर कुटुंब आणि मित्रपरिवाला त्रासदायक ठरते, असे या अभ्यास करणारे मार्क यांनी केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झालेय.

Share this Story:

Follow Webdunia marathi