Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेगनेंसी दरम्यान ताण ठेवा दूर

प्रेगनेंसी दरम्यान ताण ठेवा दूर
, शनिवार, 31 जानेवारी 2015 (12:52 IST)
जर आपण गरोदर असाल, तर जितकं शक्य असेल तितकं ताण-तणावापासून दूर राहा. कारण एका अभ्यासात पुढे आलंय की, गरोदर महिलेच्या ताणामुळं संबंधित हार्मोन्सचा भ्रूणाच्या विकासावर परिणाम वाईट होतो.

तणावासंबंधीच्या हार्मोन्सचा उंदिरांच्या पिलांवर काही परिणाम होतो का? याचा शोध घेण्यासाठी गर्भवती उंदराला ग्लूकोकॉर्टिकॉइड कॉर्टिकोस्टेरॉन हॉर्मोन दिलं गेलं. त्यानंतर संशोधकांना आढळलं की या हार्मोनमुळे त्यांची भूक खूप वाढली. मात्र त्यांचा प्लासेंटातून भ्रूणाला मिळणार्‍या ग्लुकोजची मात्रा कमी झाली. 
 
संशोधनाचे मुख्य लेखक ओवन वाउगन म्हणाले, निष्कर्षातून ही बाब समोर आली की, आईच्या शरीरात असलेलं तणाव हार्मोन ग्लूकोकॉर्टिकॉइड भ्रूणाच्या पोषणाला नियंत्रित करतं. आईच्या शरीरात या हार्मोनची मात्रा जितकी जास्त असेल तितका परिणाम भ्रूणाच्या विकासावर होईल. गर्भाचं वजन कमी होऊ शकतं. 
 
हा अभ्यास प्रबंध ‘द जर्नल ऑफ फिजिओलॉजी’ या मासिकात प्रकाशित झालाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi