Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिल्व वृक्ष लावा, रोगांना घालवा...!

बिल्व वृक्ष लावा, रोगांना घालवा...!

वेबदुनिया

भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरु करण्यात आली. बिल्वपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्व आणि सुगंध पसरला जातो. वेळोवेळी अंगाला स्पर्श करण्यामुळे शरीरावर आक्रमण करणारे विषाणू मरण पावतात तसेच बिल्व सुगंधाने पळून जातात. शेकडो रोगांना नष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या ह्या दिव्य वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून, त्याला पुजेतही स्थान देऊन त्याचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेला.

बिल्व किंवा बेल वृक्षाचे विविध भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. कुळनाव- Rutaceae लैटीननाव- Aegle marmelos corr. इंग्रजी नाव- Bael Fruit Tree , Bael संस्कृत- बिल्व, शैलपत्र, शिवेष्ट, पुतिवात, श्रीफळ मराठी- बेल, बिल्व हिंदी- बेल, विली, श्रीफल.

२५ ते ३० फुट उंच वाढणाऱ्या या झाडाला भारतीय शास्त्रात आणि वैदिक साहित्यात दिव्यवृक्ष म्हटले आहे. या झाडाची पिकलेली पिवळी फळे खाली न पडता देठालाच चिकटून राहिली तर पुढच्यावर्षी पुन्हा हिरवी होतात यामुळे दिव्यवृक्ष असे म्हटले आहे. बेलात साखर कमी करणारा घटक, टनिक असिड, उडनशील तेल, टनीन तसेच मारशेलीनीस आदी घटक असतात.
भावप्रकाश, सुश्रुत साहिंता, भैषज्य रत्नावली आदी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बेलाच्या उपयोगाबाबत खूप लिहून ठेवलेले आहे. उष्णताहरक, वात कफ शामक, रेचक, दीपनकारी, हृदयास उपकारक, स्तन्भक, शरीरातील मुत्र व शर्करा कमी करणारा आदी महत्वपूर्ण गुणधर्म असलेला बेल आयुर्वेदाचा महत्वपूर्ण झाड आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील दाह कमी करण्यासाठी क त्रिम शरबत वापरणाऱ्या फारच कमी लोकांना माहित आहे कि, बेलापासू बनलेले शरबत सर्व दृष्टीने उपकारक आहे.

रातांधळेपणा, डोकेदुखी, डोक्यातील उ नाशक, क्षय, बहिरेपणा, हृदयविकार, पोटाचे दुखणे, अजीर्ण, आम्लपित्त, मंदाग्नी, संग्रहणी, रक्तविकार, मधुमेह, जलोदर, त्वचाविकार, वात ज्वर, कमजोरी, अग्निदग्ध, व्रण गलगंड, तृषाविकार, रक्तातीसार, पित्त अतिसार आदी विकारांमध्ये विशेष गुणकारी आहे. परंतु आयुर्वेदिक तज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यायाला हवेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेक्सदरम्यान येतात असे काही मजेदार क्षण