Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भिजलेले बदाम खाण्याचे फायदे

भिजलेले बदाम खाण्याचे फायदे
, शुक्रवार, 11 डिसेंबर 2015 (12:08 IST)
बदाम भिजवून खाणे फारच फायदेशीर ठरतात. बदाम भिजवल्यानंतर नरम होतात आणि पचण्यास सोईस्कर असतात. तसं तर बदामाला 5 - 6 तास भिजवून ठेवण्यात येत पण काही लोक रात्री भिजवून सकाळी त्याचे सेवन करतात. बदामाचे नियमित सेवन केल्याने त्याचे बरेच फायदे होतात.   
 
भिजलेल्या बदामाचे सेवन केल्याने गर्भातील शिशूच्या मस्तिष्क आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमला फायदा होतो. कारण यात फॉलिक ऍसिडची भरपूर मात्रा असते.   
 
बदाम भिजवून ठेवल्याने ते नरम पडतात जे पचण्यास योग्य असतात. भिजलेले बदाम पचन क्रियेला मजबूत बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.   
 
रोज नेमाने बदाम खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत. भिजलेले बदाम खाल्ल्याने रक्तात अल्फाल टोकोफेरॉलची मात्रा वाढते, जी एक सामान्य ब्लड प्रेशरला व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावते.  
 
हे हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यात मदत करतात. बदाम शरीरातील चांगले कोलेस्टरॉलची मात्रा वाढवण्यात आणि ‘खराब’ कोलेस्टरॉलच्या स्तराला कमी करण्याचे कार्य करतात.   
 
नेहमी आमचे कुटुंबातील मोठे लोक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाण्याचे सल्ला देत आले आहे. वैज्ञानिकांचे देखी असे मानणे आहे की रोज बदामाचे सेवन केल्यानं स्मरणशक्ती मजबूत होते.   
 
केसांच्या आरोग्यासाठी देखील डॉक्टर्स रोज बदाम खाण्याचा सल्ला देतात.   
 
बदाम कोलेस्ट्राल व वजन कमी करण्यासाठी देखील कारगर सिद्ध झाले आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi