Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोक खोटं का बरं बोलत असतील?

लोक खोटं का बरं बोलत असतील?
, शुक्रवार, 5 सप्टेंबर 2014 (12:47 IST)
काही लोकांच्या तोंडातून नेहमी खोटेच शब्द बाहेर पडतात.. का होत असेल बरं असं? असा प्रश्न तुमच्याही मनात बर्‍याचदा आला असेल.. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात याचं उत्तर सापडलंय. 
 
काही लोक नेहमी खोटंच बोलताना आढळतात तर काही जण सत्यासाठी कोणताही त्याग करायला तयार असतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, याचा संबंध मेंदूच्या एका भागाशी असतो.
 
या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, संज्ञानात्मक नियंत्रणासाठी उत्तरदायी मेंदूचा एक प्रमुख भाग ‘डॉर्सो लेटरल प्री फ्रंटल कॉर्टेक्स’ इमानदार व्यवहारासाठी महत्त्वाची भूमिका निभावतो. अमेरिकेत वर्जिनिया टेक कारिलियन रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये पोस्ट डॉक्टरल सहकारी आणि अभ्यासाच्या प्रमुख लेखिका लूशा झू सांगतात की, बहुतांशी लोक खोटं बोलण्याचा तिरस्कार करतात. ‘डॉर्सो लेटरल प्री फ्रंटल कॉर्टेक्स’मध्ये आघात झाला असेल तर असे लोक इतरांप्रमाणे खोटं बोलण्याचा तिरस्कार करणारे नसतात. 
 
अशा लोकांचा व्यावहारिक विकल्प निवडण्याकडे कल दिसतो. अशा लोकांना ‘आपल्या इमेजवर याचा काय प्रभाव पडेल?’ याचीही चिंता नसते. स्वस्थ ‘डॉर्सो लेटरल प्री फ्रंटल कॉर्टेक्स’ आणि आघात झालेल्या ‘डॉर्सो लेटरल प्री फ्रंटल कॉर्टेक्स’ या दोन्ही व्यक्तींचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला गेलाय. हा अभ्यास ‘नेचर न्यूरोसायन्स’ या पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi