Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सतत टीव्ही बघण्याने डोळे, मेंदूवर परिणाम

सतत टीव्ही बघण्याने डोळे, मेंदूवर परिणाम
लहान मुले सतत दूरदर्शन पुढे बसून त्यावरील कार्यक्रम बघत असतात. त्यामुळे त्यांना इतर कशाचेही भान राहत नाही. दूरदर्शनमुळे तर अभ्यासाकडेही दुर्लक्ष होत आहे. सतत दूरदर्शन बघितल्याने त्याचा डोळ्यावर आणि मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांना फार वेळ दूरदर्शन बघू देऊ नका, असा सल्ला शहरातील नेत्रतज्ज्ञ व मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे. दूरदर्शनवर सतत चोवीस तास कार्यक्रम सुरू असतात. लहान मुलांसाठी तर विविध वाहिन्याच आहेत. या वाहिन्यावरील विविध कार्यक्रम बघताना लहान मुलांना तर कशाचेही भान राहत 
नाही. आईवडिलांनी केलेल्या सूचनांकडेही ते दुर्लक्ष करतात. परंतु हे दुर्लक्ष मुलांच्या बाबतीत हानीकारक ठरू शकते. सतत दूरदर्शनवरील कार्यक्रम बघितल्याने मुलांना विविध आजारही होऊ शकतात, असे एका संशोधनातून पुढे आले आहे. सतत एकाच पद्धतीचे दृष्य बघण्याने मेंदूवर परिणाम होतो. हिंसात्मक दृष्य बघितल्याने मुले हिंसात्मक वृत्तीची बनतात. त्यातच विविध कार्यक्रम दूरदर्शनाच्या अगदी जवळून बघण्याची मुलांना सवय झाली आहे. जवळून बघण्यामुळे सर्वाधिक डोळ्यांवर परिणाम होतो. 
 
डोळे शुष्क होतात. डोळ्यात जळजळ होते. डोळ्यांच्या मांसपेशीवर ताण पडतो. डोळ्यांच्या मांसपेशी मृत पावण्याची भीती असते. तसेच दूरदर्शनच्या पडद्यावरून बाहेर पडणार्‍या किरणांमुळे डोकेदुखी वाढते. पालकांसोबत लहान मुलांचे दूरदर्शन बघण्याचे प्रमाण हे 80 टक्के आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi