Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मृतिभ्रंशचा उपचार होणार सोपा

स्मृतिभ्रंशचा उपचार होणार सोपा
, बुधवार, 18 फेब्रुवारी 2015 (15:14 IST)
डिमेंशिया म्हणजे स्मृतीभ्रंशाच्या समस्येच्या उपचारासाठी एक अतिशय सोपी पद्धत शोधून काढली आाहे. त्यांनी एक असा एक बायोमार्कर शोधून काढला आहे, ज्याच्या मदतीने रक्ताच्या सामान्य चाचणीतूनच डिमेंशियाच्या लक्षणांची ओळख पटविली जाऊ शकते. डिमेंशिया वाढत्या वयामध्ये स्मृतीशी संबधित एक गंभीर समस्या असून अनेक वृद्धांना ती सतावते. यासंबंधीच्या एका ताज्या संशोधनात असे आढळून आले की, रक्तातील अपोलिपो प्रोटीन 'ई' घटकाची कमतरता भविष्यात डिमेंशियाचा धोका वाढवते. डेन्मार्कमधील युनिव्हर्सिटी ऑफ 
कोपेनहेगनचे प्राध्यापक रुथ फ्रिक यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या संशोधनात ७६ हजार लोकांना समाविष्ट करणयत आले होते. या ताज्या संशोधनाच्या मदतीने डिमेंशियाचा धोका टाळणे वा रोखणे आता शक्य होईल. फ्रिक यांनी सांगितले की, रक्ताच्या चाचणीद्वारे वाढत्या वयात डोके वर काढणार्‍या डिमेंशियाच्या धोक्यची अचूक माहिती मिळू शकेल. त्याच्या मदतीने या समस्येने बाधित असण्याची जास्त शंका असलेल्या लोकांची सहज ओळख पटविली जाऊ शकेल. रक्तीतील अपोलिपो प्रोटीन ईची कमतरता मेंदूतील ही उणीव दाखवून देतो. त्यामुळे 
विस्मृतीची समस्या जडते.

Share this Story:

Follow Webdunia marathi