Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हृदयविकारावर स्टेम सेल्सच्या इंजेक्शनचा इलाज

हृदयविकारावर स्टेम सेल्सच्या इंजेक्शनचा इलाज
, मंगळवार, 30 सप्टेंबर 2014 (13:00 IST)
हृदयविकारावरील उपचार आता एका स्टेम सेल्सच्या इंजेक्शनने होत आहे. विशेषत: कार्डियोमायोपॅथी म्हणजेच हृदयाचा आकार मोठ्या होण्यावर हा उपचार आहे. या समस्येवर पूर्वी केवळ हृदय प्रत्यारोपण हाच 85 रूग्णांवर इंजेक्शनने यशस्वी उपचार करण्यात आला आहे. 
 
एम्सने 2009 मध्ये प्रथमच स्टेम सेल्सच्या सहाय्याने उपचार शोधला. एम्सच्या स्टेम सेल्स कमेटीच्या प्रमुख डॉ. सुजाता मोहंती यांनी याबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या, अन्य आजारांप्रमाणेच हृदयविकारावरही स्टेम सेल्सच्या सहाय्याने उपचार होऊ शकतो. सध्याच्या त्याच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या एम्समध्ये सुरू आहेत. 
      
कार्डियोलॉजिस्ट डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले, हृदयाच्या 50 टक्के आजारांवर स्टेम सेल्सचा यशस्वी उपचार होऊ शकतो. यावर अध्याप संशोधन सुरू आहे. जर हे प्रयोग यशस्वी ठरले तर हृदयविकारावर सर्जरी करण्याची गरज राहणार नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi