ड्राय फ्रुट्स खाणे आपल्या आरोग्यसाठी चांगले असते. यामुळे शरीराला पोषण मिळते. जर तुम्ही रोज ड्राय फ्रुट्स मध्ये अक्रोड खात असला तर यांसंबंधित काही गोष्टी तुम्हाला माहित असाव्यात.
अक्रोड खाल्ल्याने शरीराची इम्युनिटी मजबूत होते. अक्रोड मध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड हृदयाला आरोग्यदायी ठेवते. यामुळे मेंदू एक्टीव राहतो. पण उन्हाळ्यात अक्रोड किती आणि केव्हा खावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण जास्त अक्रोड खाल्यास देखील नुकसान होऊ शकते. तर चला जाणून घेऊ या अक्रोड खायची योग्य पद्धत
दैनंदिन जीवनशैलीमध्ये तुम्ही रोज 2 किंवा 3 अक्रोड खाऊ शकतात. पण जर तुम्ही जास्त खात असाल तर समस्या होऊ शकते.
उन्हाळ्यामध्ये अक्रोड भिजवून खाणे योग्य असते. म्हणजे त्यामधील उष्णता निघून जाते. तसेच पौष्टिक तत्वात वाढ होते. तुम्ही रात्री स्वच्छ पाण्यात अक्रोड भिजवून ते दुसऱ्या दिवशी खाऊ शकतात.
अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 फॅटी एसिड असते. याशिवाय आयरन, फास्फोरस, कॉपर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नाशीयम आणि सेलेनियम सारखे पोषक तत्व असतात. नियमित अक्रोड खाल्ल्याने मेंदू तेज होतो. तसेच स्मरणशक्ती वाढते.
अक्रोड तुम्ही तुमच्या डाइटमध्ये देखील सहभागी करू शकतात. अक्रोड शेक सोबत सेवन करू शकतात.
उन्हाळ्यात अक्रोड भाजून खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. म्हणून धणे, बडीशोप, पुदिना यांसोबत अक्रोड भाजून खावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik