Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संगीताची आवड आहे? तर या आजारांना बळी पडणार नाही

संगीताची आवड आहे? तर या आजारांना बळी पडणार नाही
, बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (12:09 IST)
संगीत हे मनोरंजनाचे उत्तम साधन मानले जाते. विज्ञानानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती आपले आवडते संगीत ऐकत असते, तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाच्या रसायनचा स्त्राव होतो. हे रसायन आनंदी संप्रेरक म्हणूनही ओळखले जाते कारण हा संप्रेरक आनंद आणि कुतूहल वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच संगीत आकर्षित करतं.
 
तणाव कमी करण्यास मदत करतं - अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की संगीताचा आपल्या आरोग्यावर थेट सकारात्मक परिणाम होतो आणि यामुळे तणाव कमी होण्यासही मदत होते. याचे कारण असे की संगीत ऐकताना आपण सर्व तणाव विसरून त्याच्या जगात कुठेतरी हरवून जातो. तुम्ही बरेचदा ऐकले असेल की जेव्हा तुम्हाला जास्त तणाव वाटत असेल तेव्हा खूप जोरात संगीत ऐकल्याने तणाव पातळी कमी होते.
 
संगीत ऐकल्याने निद्रानाशाच्या समस्येपासून सुटका मिळते- संशोधनानुसार, निद्रानाशाची समस्या संगीत न ऐकणाऱ्या लोकांपेक्षा संगीत ऐकणाऱ्या लोकांमध्ये कमी दिसते. शास्त्रीय संगीत ऐकल्याने रात्री चांगली झोप येते असे सांगितलं जातं. असे करणे हा या समस्येपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा, प्रभावी आणि स्वस्त मार्ग आहे.
 
हृदय निरोगी ठेवतं - हृदयाच्या रुग्णांनी अधिकाधिक गाणी ऐकावीत. त्याचे आवडते संगीत ऐकून त्याला आनंद मिळतो. जेव्हा एखादी व्यक्ती संगीत ऐकते तेव्हा मेंदूमध्ये एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे व्यक्ती हृदयाशी संबंधित आजारांपासून मुक्त होते.
 
रोग प्रतिकारशक्ती वाढवते - संगीत ऐकल्याने मेंदूतील तणावाची पातळी कमी होते आणि त्याच्या कमी झाल्यामुळे आपण आनंदी होतो. डॉक्टर म्हणतात की हसण्याने रक्त वाढते आणि रक्ताच्या वाढीमुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
 
उदासीनता दूर होण्यास मदत मिळते - बरेच लोक ताण आणि चिंतांमुळे नैराश्यासारख्या गंभीर समस्यांना बळी पडतात, ज्यातून ते अनेक लोकांसाठी दलदलीत अडकण्यासारखे बनते. पण जे संगीत ऐकतात, उदासीनता त्यांच्यापासून दूर असते आणि ते दिवसभर आनंदी राहतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॅग्स ची अशा प्रकारे काळजी घ्या,दीर्घकाळा पर्यंत खराब होणार नाही