स्तनांचा कॅन्सर ही आजच्या युगातली महिलांपुढील सर्वात मोठी समस्या आहे. गरोदर असताना किंवा गर्भारणपणानंतर वर्षभरात स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. प्रमाण कमी असलं तरी या व्याधीकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखं नाही. गरोदरपणातल्या स्तनांच्या कॅन्सरबाबत...
गरोदरपणात तसंच त्यानंतर स्त्रीच्या शरीरात हार्मोन्सशी संबंधित अनेक बदल होतात. यामुळे स्तन कॅन्सर विकसित होण्यास पोषक वातावरण तयार होतं. मोठ्या वयातल्या गरोदरपणामुळे ही समस्या उद्भवू शकते. 32 ते 38 या वयोगटातल्या गरोदर स्त्रियांना स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
लक्षण : गरोदरपणातल्या स्तन कॅन्सरमध्ये तीच लक्षणं आढळून येतात. पण गरोदरपणात स्तनांच्या आकारात बदल होत राहतो. गाठीही येतात. त्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचं निदान लवकर होत नाही आणि उपचारांना उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो.
काळजी : गरोदरपणात स्तनांची नियमित चाचणी करायला हवी. स्तन तसेच काखेत आलेल्या काठीकडे दुर्लक्ष करू नये. अल्ट्रासाउंड, एमआआय चाचणीद्वारे गाठींच निदान करून घेता येईल. गरोदरपणातल्या स्तन कॅन्सरवर वेळेत उपचार करून घेणं गरजेचं आहे. घरात स्तन कॅन्सरचा इतिहास असेल तर स्तनांची वेळोवेळी तपासणी करून घ्यायला हवी. गरोदरपणातला स्तन कॅन्सर योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो. गरज आहे ती वेळेत निदान होण्याची.