Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता, कलिंगडाचे साल देखील फायदेशीर आहे

काय सांगता, कलिंगडाचे साल देखील फायदेशीर आहे
, बुधवार, 17 मार्च 2021 (08:45 IST)
उन्हाळ्यात कलिंगड शरीराला थंडावा देऊन उष्णता कमी करतो. रसाळ आणि चविष्ट असणारं हे फळ सगळ्यांना आवडतो. आपण कलिंगड  खाऊन साल फेकून देत असाल तर आम्ही आपल्याला कलिंगडाच्या सालीचे फायदे सांगत आहोत. हे वाचल्यावर आपण कलिंगडाच्या सालींचा वापर देखील कराल. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* फायबरने समृद्ध -फायबर ने समृद्ध असल्याने पोट स्वच्छ करत रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत करत. कोलेस्ट्रॉल कमी करत .
 
* वजन कमी करतात - या मध्ये लो कॅलरी असते यामुळे चयापचय उर्जावान होऊन फॅट बर्न करून वजन कमी करतात . 
 
* कलिंगडाच्या सालाची भाजी- सालाची भाजी चविष्ट असतेच. हे आरोग्य सुधारण्यात देखील मदत करते.ही भाजी पोषक घटकांनी समृद्ध असते. 
 
* निद्रानाश ची समस्या दूर करते- जर आपल्याला निद्रानाश चा त्रास आहे तर सालाचा वापर करावे. या मध्ये मॅग्नेशियम आढळतो. या खनिजामुळे झोप चांगली येते. 
 
* सुरकुत्या कमी होतात- कलिंगडाच्या सालींमधे लायकोपिन,फ्लेवोनाईड आणि अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.जे फ्री रॅडिकल्स चा प्रभाव कमी करून त्वचे वरील काळे डाग, आणि सुरकुत्या कमी करतात.  
 
* मुरूम नाहीसे करतात- हे साल नैसर्गिक टोनर म्हणून देखील काम करतात.त्वचेजवरील तेलकट पणा कमी करून मुरुमांना नाहीसे करतात. याचा वापर आपण नियमितपणे करून त्वचा उजळू शकता. 
 
* नैसर्गिक क्लिन्झर -त्वचा कोरडी झाली असेल,काळपटली असेल तर आपण सालांचा वापर करावा. मानेवर साल चोळा आणि नंतर त्याला नैसर्गिक कोरडे होऊ द्या नंतर पाण्याने धुवून घ्या. तजेल आणि सुंदर मऊ त्वचा मिळविण्यासाठी दररोज असे करावे.  
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरातील लाकडी फोटो फ्रेम कशी स्वच्छ करावी या टिप्स अवलंबवा