Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिद्धांत वीर सूर्यवंशीला जास्त व्यायाम करणं जीवावर बेतलं? व्यायामावेळी 'या' चुका जीवघेण्या ठरू शकतात

सिद्धांत वीर सूर्यवंशीला जास्त व्यायाम करणं जीवावर बेतलं? व्यायामावेळी 'या' चुका जीवघेण्या ठरू शकतात
, शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (22:36 IST)
सिद्धांत वीर सूर्यवंशीला जास्त व्यायाम करणं जीवावर बेतलं? व्यायामावेळी 'या' चुका जीवघेण्या ठरू शकतात
टीव्ही अभिनेते सिद्धांत वीर सूर्यवंशी यांची व्यायाम करताना कार्डिअॅक अरेस्ट आला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. व्यायाम करताना ते कोसळले आणि त्यानंतर त्यांनी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.
 
सिद्धांत 46 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1975 रोजी मुंबईत झाला होता. त्यांनी 'कुसुम', 'कसौटी जिंदगी की', 'कृष्णा-अर्जुन', 'जमीन से आसमान तक', 'क्या दिल में है' या मालिकांमध्ये काम केलं होतं.
 
काही दिवसांपूर्वी कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचा सुद्धा असाच मृत्यू झाला होता. पुनीत राजकुमार अत्यंत फिट असल्याचं म्हटलं जात होतं. ते 46 वर्षांचे होते.
 
तर अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचासुद्धा व्यायाम करताना अटॅक येऊन मृत्यू झाला होता.
"लोक वजन उचलण्यासारखा व्यायाम करतात त्यावेळी स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो. वजन उचलल्यामुळं नसांवर जोर पडतो. खूप जास्त आणि मर्यादेपलिकडे व्यायाम हृदयाच्या वॉल्व्हसाटी चांगला नसतो," असं जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियो व्हॅस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्च (एसजेआयसीएसआर) चे संचालक डॉ. सीएन मंजुनाथ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
25-40 वयोगटात हार्ट अटॅक
्््सजेआयसीएसआरद्वारे 2017 मध्ये दोन हजार जणांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यात 25-40 वयोगटातील लोकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं असल्याचं, समोर आलं. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अशा प्रकरणांमध्ये 22 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. अभ्यासात 1500 रुग्ण कर्नाटकचे होते, तर 500 देशातील इतर राज्यांचे होते. डॉ. मंजुनाथ यांच्या मते, या लोकांमध्ये हृदयाशी संबंधित इतर आजार नव्हते. शिवाय हार्ट अटॅकची शक्यता वाढणारी धुम्रपान, कौटुंबिक पार्श्वभूमी, मधुमेह, हायपरटेन आणि हाय कोलेस्ट्रॉल अशी इतर कारणंही नव्हती.
जिमचं वेड
आजच्या काळात तरुणांमध्ये जिममध्ये जाऊन मसल्स तयार करण्याबाबत एक वेड निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
''अनेक जिममध्ये तरुणांना स्टेरॉईड घेण्याचा सल्ला दिला जातो. स्टेरॉईड आरोग्यासाठी चांगले नसतात. भारतात अशा जिमची संख्या कमीदेखील असू शकते. पण हा अत्यंत चर्चेचा विषय आहे," असं मत असोसिएशन ऑफ हेल्थ प्रोव्हायडर्सचे अध्यक्ष डॉ. अॅलेक्सेंडर थॉमस यांनी मांडलं.
 
"जिममध्ये जाणाऱ्या लोकांनी प्रोटीन घ्यायला हवं अशी मान्यता आहे. मात्र, त्याला कसलाही आधार नाही. असं करणं चुकीचं आहे. डाएटमध्ये प्रोटीनची कमतरचा नसेल, तोपर्यंत सप्लिमेंट घ्यायची काहीही गरज नसते. जे लोक क्रीडा क्षेत्रांशी संबंधित असतात तेदेखील डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्रोटीन घेतात," असं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ शीला कृष्णास्वामी म्हणाल्या.
 
व्यायाम किती करावा?
डॉ. मंजूनाथ सांगतात की, हाय इंटेन्सिटी एक्सरसाईज (अधिक तणाव निर्माण होणारा व्यायाम) करण्यापूर्वी हृदयाची तपासणी करायला हवी. "लगेचच खूप जास्त व्यायाम सुरू करू नये. सुरुवातीला वॉर्म अप एक्सरसाईज करायला हवा. शिवाय हाय इंटेन्सिटी वर्कआऊट सुरू केल्यानंतरही तो रोज करू नये. त्यामुळं हृदयाशी संबंधित आजार सुरू होऊ शकतात." असं ते सांगतात. जिममध्ये ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी एक रुटीन निश्चित करून त्याचं पालन करावं, असं फिजिओथेरपिस्टचं मत आहे. "एका ठिकाणी किंवा बैठी लाईफस्टाईल असलेल्यांनी अनेक तपासण्या करायला हव्या. ते लवकर थकत तर नाहीत, हे त्यातून पाहायचं असतं. एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या व्यायामासाठी फिट आहे किंवा नाही, हे त्याद्वारे तपासायचं असतं," असं मेंगळुरूचे पीए इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीचे प्राध्यापक सजीश रघुनाथन म्हणाले.
"सुरुवातीला सावधगिरी बाळगण्यासाठी हाय इंटेन्सिटी वर्कआऊट सुरू केल्यानंतर तुम्हाला फार वेळ तर व्यायाम करत नाही, याकडं लक्ष द्यायचं असतं. बाहेरून निरोगी दिसणं म्हणजे तुमचं हृदयदेखील निरोगी असेलच असं नाही," असं डॉ. मंजूनाथ म्हणतात. जिममध्ये लोकांच्या आरोग्यावर निगराणी ठेवण्यासाठी डॉक्टर असायला हवे, या कुमारस्वामींच्या मताशी डॉ. मंजूनाथ यांनी सहमती दर्शवली. "मी तर सल्ला देईल की, जिममध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित लोक असायला हवे. त्यांना पुनर्जीवन उपकरणं चालवता यायला हवी, तसंच आपत्कालीन स्थितीत हृदय पुन्हा सुरू करण्यासाठी डेफिब्रिलेटर शॉक देता आलं पाहिजे," असं ते म्हणाले.
 
कार्डिअॅक अरेस्ट नेमका काय असतो?
कार्डिअॅक अरेस्ट हा शब्द आपण अनेकदा ऐकला असला, तरी त्याचा अर्थ अनेकांना माहिती नसतो. Heart.org या संस्थेनुसार 'कार्डिअॅक अरेस्ट' होतं तेव्हा शरीराकडून त्याविषयी कुठलाही संकेत मिळत नाही. याचं मुख्य कारण हृदयात होणारी इलेक्ट्रिकल गडबड आहे, जी हृद्याच्या ठोक्यांचं ताळमेळ बिघडवते. यामुळे हृदयाच्या रक्त पंप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे मेंदू किंवा इतर अवयवांपर्यंत रक्त पोहोचवण्यात अडथळे निर्माण होतात. अशा वेळी काही क्षणांतच व्यक्ती बेशुद्ध पडते आणि हृदयाचे ठोकेही मंदावत जातात. जर योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत, तर काही सेकंदांत किंवा मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
 
'कार्डिअॅक अरेस्ट'मध्ये मृत्यू नक्की?
अमेरिकेत प्रॅक्टिस करत असलेले डॉक्टर सौरभ बंसल यांनी बीबीसीला सांगितलं, "खरं तर कार्डिअक अरेस्ट हा प्रत्येक मृत्यूचा अंतिम क्षण म्हटला जाऊ शकतो. याचा अर्थ आहे हृदयाचे ठोके बंद पडणे आणि मृत्यूचं कारणही हेच असते." पण याचं कारण काय असावं? डॉक्टर बंसल म्हणतात, "याची वेगवेगळी कारणं असू शकतात. सामान्यपणे याचं एक प्रमुख कारण हे मोठा हार्टअटॅक असू शकतं" ब्रिटिश हार्ट फाउंडेशनुसार, हृदयातील इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये अडचणी उद्भवल्यानंतर शरीराच्या इतर भागांत रक्तपुरवठा होऊ शकत नाही आणि हीच प्रक्रिया कार्डिअॅक अरेस्टचं स्वरूप घेते. जेव्हा हृदय रक्ताचं पंपिंग बंद करतं, तेव्हा मेंदूतील ऑक्सिजनचं प्रणाणही घटतं. अशावेळी व्यक्ती बेशुद्ध पडते आणि श्वास घेता येत नाही.
 
याची काही लक्षणं असतात का?
सगळ्यांत मोठी अडचण हीच आहे की, कार्डिअॅक अरेस्ट येण्याआधी त्याची काहीच लक्षणं दिसत नाही. हेच कारण आहे की, कार्डिअॅक अरेस्टमध्ये मृत्यू येण्याचा धोका कैक पटींनी वाढतो.
 
यात सर्वसाधारण कारण हे असामान्य हार्ट ऱ्हिदम असल्याचं म्हटलं जातं. ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'वँट्रिकुलर फिब्रिलेशन' म्हटलं जातं. कार्डिअॅक अरेस्टची अनेक कारणं असू शकतात.
 
पण हृदयविकाराशी निगडीत आरोग्य समस्या याविषयीची शक्यता वाढवतात :
 
कोरोनरी हार्टचा आजारहार्ट अटॅक
कार्डियोमायोपॅथी
काँजेनिटल हार्टचा अजार
हार्ट वॉल्वमधील अडथळे
हार्ट मसल्समधील इन्फ्लेमेशन
लाँग क्युटी सिंड्रोमसारखे डिसऑर्डर
याशिवाय इतरही काही कारणं आहेत, जे कार्डिअॅक अरेस्टला निमंत्रण देऊ शकतात :
 
विजेचा झटका बसणं
प्रमाणापेक्षा जास्त ड्रग्ज घेणं
हॅमरेज, ज्यात रक्तस्राव होतो
पाण्यात बुडणं
Published By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Matar Mushroom recipe : घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट मटार मशरूम, जाणून घ्या रेसिपी