बऱ्याच लोकांना पुन्हा पुन्हा लघवी होण्याचा त्रास असतो ह्या मागील कारण काय आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला या मागील कारणे जाणून घेऊ या.
1 वारंवार लघवी करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मूत्राशयाची अत्याधिक सक्रियता असू शकते. अशा परिस्थितीत व्यक्ती वारंवार लघवी करण्यास प्रवृत्त होतो.
2 वारंवार लघवी येण्याचे मुख्य कारण मधुमेह असू शकतो. रक्तात आणि शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यावर हा त्रास वाढतो.
3 जर आपल्याला युरिनली ट्रॅक इन्फेक्शन आहे तर आपल्याला या समस्याला सामोरी जावे लागणार . अशा स्थितीत वारंवार लघवी केल्यानं मूत्रात जळजळ होते.
4 प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यावर देखील ही समस्या उद्भवू शकते.
5 किडनीमध्ये संसर्ग झाल्यावर देखील ही समस्या उद्भवू शकते .जर आपल्याला हा त्रास आहे तर आपण ह्याची तपासणी करावी.
या साठी हे उपाय अवलंबवू शकता-
1 भरपूर पाणी प्या जेणे करून कोणत्याही प्रकारचे संसर्ग झाले असेल तर लघवीतून निघून जाईल आणि या मुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
2 दररोज दही, पालक तीळ, आळशी, मेथीची भाजीचे सेवन केल्यानं या समस्येपासून फायदा होतो.
3 वाळलेल्या आवळ्याला वाटून ह्याची भुकटी बनवा आणि या मध्ये गूळ मिसळून खा. असं केल्यानं या मुळे वारंवार लघवी येण्याच्या समस्येपासून फायदा होईल.
4 डाळिंबाची साले वाळवून घ्या आणि वाटून भुकटी बनवा. आता सकाळ संध्याकाळ ही भुकटी पाण्यासह घ्या. आपली इच्छा असल्यास आपण ह्याची पेस्ट देखील बनवू शकता.
5 मसुरीची डाळ, मोड आलेले कडधान्य, गाजराचे ज्यूस आणि अंगूर ह्याचे सेवन देखील या समस्येवर प्रभावी उपाय आहे.