Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्यः नारळाचं तेल लोण्याइतकंच आरोग्याला अपायकारक असतं का?

webdunia
बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (20:57 IST)
नारळाचं तेल बिफ आणि लोण्याइतकंच आरोग्याला अपायकारक असतं, असं अमेरिकेतील हृदयविकार तज्ज्ञ म्हणतात.
 
हे पदार्थ संपृक्त (saturated fat) चरबीयुक्त असतात आणि त्यातून 'वाईट' कोलेस्टेरॉल वाढू शकतं, असं अमेरिकन हार्ट असोसिएशनने सुधारित सल्ल्यामध्ये नमूद केलं आहे.
 
नारळाचं तेल सर्रास आरोग्यवर्धक अन्नपदार्थ म्हणून विकलं जातं आणि त्यातील चरबी आपल्या आरोग्याला इतर संपृक्त चरबीपेक्षा चांगली असते असाही दावा काही जण करतात.
 
परंतु, अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, या दाव्याला कोणत्याही अभ्यासांचा पुरेसा आधार नाही.
 
आरोग्याविषयीचं मिथक?
कोणते चरबीयुक्त पदार्थ खावेत यासंबंधीचे सल्ले अतिशय गोंधळात टाकणारे असू शकतात.
डुकराच्या चरबीसारखे पदार्थ सर्वसाधारणतः वाईट मानले जातात, तर वनस्पती तेल आरोग्याला उपकारक मानलं जातं.
 
या पदार्थांमध्ये विशिष्ट प्रकारची- म्हणजे संपृक्त- चरबी किती प्रमाणात असते, यावर आधारित हा सिद्धान्त आहे.
 
संपृक्त चरबी
संपृक्त चरबी आपल्याला आरोग्यासाठी वाईट असते, असं म्हटलं जातं. पण सर्वांची याला सहमती नाही.
 
जास्त संपृक्त चरबी असलेला आहार खाल्ल्याने रक्तामधील 'वाईट' कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, त्यातून रक्तवाहिन्या चोंदण्याचा आणि हृदयविकाराचा वा पक्षाघाताचा झटका येण्याचा धोका वाढतो.
 
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, नारळाच्या तेलातील 82 टक्के चरबी संपृक्त असते. लोणी (63 टक्के), बिफ (50 टक्के) व डुकरांचं मांस (39 टक्के), याहून हे प्रमाण जास्त आहे. शिवाय, इतर संपृक्त चरबीप्रमाणे यातून 'वाईट' कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते, असं अभ्यासांतून दिसून आलं आहे.
नारळाच्या तेलातील चरबीचं मिश्रण आरोग्यासाठी हितकारक असल्याचा दावा काही जण करतात, पण अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार या दाव्याला आधार देणाराही पुरेसा पुरावा नाही.
 
लोकांनी संपृक्त चरबीचं मर्यादित सेवन करायला हवं, आणि त्याऐवजी असंपृक्त वनस्पती तेलं- ऑलिव्ह तेल व सूर्यफूल तेल यांचा वापर करायला हवा, असं या संस्थेने म्हटलं आहे.
 
आरोग्यासाठी हितकारक बदल
अशा प्रकारे आहारात बदल केल्यास कोलेस्टेरॉलचं प्रमाण बरंच कमी होऊ शकतं, असं अमेरिकन हेल्थ असोसिएशनने म्हटलं आहे.
 
या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या सल्लापत्रकाचे प्रमुख लेखक डॉ. फ्रँक सॅक्स म्हणतात, "हृदयविकार व रक्तवाहिन्यांचे विकास थांबवण्यासाठी आहारातील संपृक्त चरबी मर्यादित करणं योग्य आहे, याला मोठ्या प्रमामात वैज्ञानिक संशोधनाचा आधार आहे, हे आम्हाला स्पष्टपणे मांडायचं होतं."
 
युनायटेड किंगडममध्ये 'पब्लिक हेल्थ इंग्लंड' ही संस्था लोकांना अन्नातील संपृक्त चरबी कमी करण्याचा सल्ला देते.
 
पुरुषाने रोज सरासरी 30 ग्रॅमहून अधिक संपृक्त चरबी खाता कामा नये.
स्त्रीने रोज सरासरी 20 ग्रॅमहून अधिक चरबी खाता कामा नये.
अन्नपदार्थांच्या पाकिटांवर पोषणविषयक तपशिलाची लेबलं लावलेली असतात, त्यात संबंधित पदार्थातील संपृक्त चरबीची माहिती दिलेली असते.
 
परंतु, चरबी हा आरोग्यदायी व चौरस आहाराचा आवश्यक भाग आहे, यावर तज्ज्ञ भर देतात. आपण खूप कमी प्रमाणात चरबीखाऊ नये. चरबीतून आवश्यक चरबीयुक्त आम्लं मिळतात आणि शरीराला अ, ड, ई इत्यादी व्हिटॅमिन रिचवण्यासाठीही त्याची मदत होते.
 
ब्रिटिश हार्ट फाउन्डेशनच्या व्हिक्टोरिया टेलर म्हणाल्या, "तुमच्या हृदयाच्या तब्येतीसाठी चांगलं खायचं म्हणजे केवळ चरबी कमी करून भागत नाही, तर विशिष्ट प्रकारची चरबी कमी करावी लागते आणि त्याऐवजी असंपृक्त चरबी व पूर्ण धान्यं खाल्ली जातील याची काळजी घ्यावी लागते. साखर व शुद्धीकरण झालेली कर्बोदकं यांचा वापर करू नये."
 
"कोणत्याही बदलाकडे संपूर्ण आहारविषयक दृष्टिकोनाच्या संदर्भात पाहायला हवं. पारंपरिक आहारामध्ये हृदयविकारासारख्या धोक्यांपासून संरक्षित करणारे अनेक लाभदायक घटक असतात, केवळ कोलेस्टरॉलची पातळी त्यात वाढत नाही.
 
"आहारामध्ये संपृक्त चरबीऐवजी असंपृक्त चरबीयुक्त पदार्थ खावेत- लोण्याऐवजी तेलाचा वापर करावा. अव्होकाडो, तेलकट मासे, टणक कवचाची फळं व बिया यांसारख्या अन्नपदार्थांची निवड करावी."
 
चरबीचं सेवन कमी करण्यासाठी काही मार्ग
• तळण्याऐवजी अथवा भाजण्याऐवजी अन्नपदार्थ वाफेवर शिजवा, लोखंडी जाळीवर भाजा वा गरम पाण्यात ठेवा.
 
• दृश्य चरबीच्या कडा काढा आणि शिजवण्यापूर्वी मांसाची साल काढा.
 
• भाजलेल्या पदार्थांमधून चरबी व तेल काढावं.
 
• सँडविच करताना लोणी न वापरायचा प्रयत्न करा.
 
चांगली चरबी विरुद्ध वाईट चरबी
• कोलेस्टेरॉल हा चरबीयुक्त पदार्थ आहे.
 
• कमी घनतेचं लिपोप्रोस्टीन कोलेस्टेरॉल 'वाईट' मानलं जातं, कारण ते रक्तवाहिन्यांमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यातून हृदयविकार व पक्षाघाताचा झटका येऊ शकतो.
 
• जास्त घनतेचं लिपोप्रोटीन कोलेस्टरॉल 'चांगलं' असतं, कारण त्यात केवळ कोलेस्टेरॉल असतं आणि तिथेच ते नष्ट होते. चांगल्या कोलेस्टेरॉलहून वाईट कोलेस्टेरॉलकडे जाणाऱ्यांच्या संख्या जास्त आहे आणि ही बाब निरोगीपणाचं लक्षण आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

Nutrition Week 2021: 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' दरवर्षी का साजरा केला जातो?