Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उच्च रक्तदाब हा पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त धोकादाक

उच्च रक्तदाब हा पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त धोकादाक

वेबदुनिया

महिला व पुरुषांमध्ये असलेल्या उच्च रक्तदाबाबाबत शास्त्रज्ञांनी प्रथमच केलेल्या संशोधनात या दोघांना असलेल्या धोक्यांमध्ये लक्षणीय फरक असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील वेक फॉरेस्ट बाप्टिस्ट मेडिकल सेंटरमधील संशोधकांनी हे संशोधन केले. या संशोधनात पुरुषांपेक्षा उच्च रक्तदाब असलेल्या महिलांना अधिक उपचाराची गरज असल्याचे स्पष्ट झाले. सर्वसाधारणपणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्च रक्तदाब असलेल्या पुरुष व स्त्रियांना एकाच प्रकारचे औषध दिले जाते, असे वेक फॉरेस्ट बाप्टिस्ट मेडिकल सेंटरमधील शल्विशारद कालरेस फोरारिओ यांनी सांगितले. जगातील हे पहिले असे संशोधन आहे, ज्यामध्ये उच्च रक्तदाबासंदर्भातील औषधांचा स्त्री व पुरुष यच्यावर होणार्‍या परिणामांचे वेगवेगळे संशोधन केले आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या पुरुषांच्या संख्येत गेल्या 20 ते 30 वर्षामध्ये घट झाली असली तरी महिलांमध्ये त्याचा परिणाम तितकासा दिसला नसल्याचे फेरारिओ यांनी सांगितले.

या संशोधनासाठी वय वर्षे 53 व त्यापेक्षा अधिक वयोमर्यादा असलेल्या 100 पुरुष व स्त्रियांची निवड करण्यात आली होती. या सर्व व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त होत्या. त्या व्यति‍रिक्त त्यांना कोणताही आजार नव्हता. य चाचण्या करताना उच्च रक्तदाबाचा हृदयावर काय परिणाम होत आहे याचे मूल्यांकन करण्यात आले. यमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंदर्भातील रोगाचे प्रमाण पुरुष व स्त्रियांमध्ये फक्त 30 ते 40 टर्क्यांपर्यंत समान असल्याचे आढळून आले. पण या दोघांमध्ये बर्‍याच प्रमाणात फरक असल्याचे संशोधनात दिसून आले. विशेष म्हणजे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणार्‍या हार्मोन्सची पातळी आणि प्रकार हेही दोघांमध्ये भिन्न असल्याचे दिसून आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुरकुत्या दूर करण्यासाठी बदाम तेल