Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीयांची पहिली पसंती कॉफी नाही तर चहाला

भारतीयांची पहिली पसंती कॉफी नाही तर चहाला
, सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (13:47 IST)
पिकते तेथे विकत नाही ही म्हण भारतीय कॉफीसाठी अगदी लागू पडताना दिसते आहे. जगात कॉफी निर्यातीत
सात नंबरवर असलेल्या भारतात नागरिकांची पहिली पसंती कॉफी नसून चहा असल्याचे इंटरनॅशनल कॉफी ऑरगनायझेशनच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. भारतात दक्षिण भारतीय कॉफी अधिक प्रमाणात पीत असले तर देशात कॉफीपेक्षा चहा पिणारे नागरिक अधिक प्रमाणात आहेत. भारतातून 767 दशलक्ष पौंड कॉफी दरवर्षी निर्यात होते. हे प्रमाण जागतिक निर्यातीच्या 4 टक्के आहे. मात्र देशात कॉफीचा खप चहाच्या तुलनेत खूप कमी आहे. जगात सर्वाधिक कॉफी खपणार्‍या देशात फिनलंड 1 नंबरवर आहे. येथे दरवर्षी सरासरी प्रत्येक नागरिकामागे 12 किलो कॉफी खपते. या यादीत नॉर्वे, आईसलंड, डेनमर्क अनुक्रमे दोन, तीन व चार नंबर वर आहेत. ब्राझील हा सर्वात मोठा निर्यातदार देश असून गेली 150 वर्षे ब्राझीलने हे स्थान टिकविले आहे. अर्थात कॉफीच्या देशांतर्गत खपात ब्राझील जगात 15 व्या नंबरवर आहे. येथून दरवर्षी 5.7 अब्ज पौंड कॉफी निर्यात होते. कॉफी खपात अमेरिका 26 नंबरवर तर ब्रिटन 45 व्या स्थानावर आहे असेही हा अहवाल सांगतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कच्ची केळी खाण्याचे फायदे