Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अयशस्वी आय.व्ही.एफ– कारण आणि प्रक्रिया

अयशस्वी आय.व्ही.एफ– कारण आणि प्रक्रिया
, बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (17:24 IST)
इन-विट्रोफर्टिलायझेशन (आयव्हीएफ) ही एक प्रभावी प्रक्रिया असून, त्यामुळे देशभरातील अनेक जोडप्यांना गर्भधारणा होण्यास मदत झाली आहे. मात्र तरीही पुष्कळ जोडप्यांना आय.व्ही.एफ. प्रक्रिया अयशस्वी झाली तर पुढेकाय? ही भीती तावत असते. ह्या प्रक्रियेमुळे गर्भ राहीलच ही गॅरंटी त्यांना हवी असते! त्यामुळे काही वेळा गोंधळदेखील उडतो. खरे तर, कोणत्या ही वैद्यकीय प्रक्रियेची डॉक्टर गॅरंटी देत नाहीत. आय.व्ही.एफ.चा निकाल विविध घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे आय.व्ही.एफ. विशेषज्ञांचासल्ला घेऊन, तुमची समस्या कोणत्या घटकांत मोडते ही माहीती करून घेणे गरजेचे आहे. 
या लेखात आपण, आय.व्ही.एफ. अयशस्वी होण्याची कारणे आणि ऊपचार या विषयावर चर्चा करणार आहोत. 
 
आयव्हीएफ अयशस्वी होण्याची कारणे
आय.व्ही.एफट्रीटमेंट अयशस्वी झालेल्या जोडप्यांना या प्रक्रिये दरम्यान नेमके काय चुकले, या विषयी फारच कमी माहिती असते. मुळात ही प्रक्रिया विविध घटकांवर अवलंबून असते. 
बीज फलन
परिपक्व झालेलं स्त्रीबीजग र्भाशयात फलन करतेवेळी, त्याची पेरणी अपयशी झाल्याने गर्भधारणा होत नाही. 
प्रजननासाठी पोषक गर्भाशय नसणे:
आयव्हीएफ चाचणी दरम्यान, डॉक्टरांना गर्भधारणेसाठी अनुकूल असा गर्भाशय सापडला नाही, तर, ही प्रक्रिया तिथेच रद्द होऊ शकते.
गर्भरोपणासाठी अपरिपक्व स्त्रीबीज:
अपरिपक्व स्त्रीबीज कींवा पुरूष शुक्राणूंच्या कमतरतेमुळे गर्भाशयात स्त्रीबीजाचे रोपण होऊ शकत नाही. 
सुपीक बीजांड नसणे:
गर्भ विकसित होण्यासाठी बीजांड उच्च प्रतीची असणे  आवश्यक आहे. निरोगी गर्भधारणेसाठी प्रजननक्षम स्त्री बीजच जर मिळाले नाहीत, तर, गर्भधारण शक्य होत नाही.
फॉलीकल्सची अपुरी संख्या:
आय.व्ही.एफ अपयशाचाहा एक प्रकार आहे, जो महिला जोडीदाराचे स्त्रीबीज गोळाकरण्या पूर्वी होतो. स्त्रीबीजांची संख्या अपुरी असल्यास IVF चालू ठेवू शकत नाही. अंडाशयातील स्त्रीबीजाच्या संख्येत वाढ होण्यासाठी वेगळ्या प्रक्रियेची आवश्यकता लागते.
 
आय.व्ही.एफ.च्या अपयशाला कसे सामोरे जाल?
आय.व्ही.एफ. ट्रीटमेंट अपयशी झाल्यामुळे दु:खी होऊनका, ही वैद्यकीय प्रक्रीया असून, त्याला सामोरे जा. अपयश येण्याचे नेमके कारण जर कळाले, तर लवकर तुम्ही या समस्येतून बाहेर येऊ शकता.  
आय.व्ही.एफ. चाचणी अयशस्वी झाल्यानंतर, तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा. 
स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा
ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद होतो, त्या सर्व गोष्टी करा. आपली आवड जपा. कुटुंबियांसोबत बाहेर फिरायला जा. दू:खातून बाहेर येण्यासाठी स्वत:ला चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवा. ज्यामुळेतुमचे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य बिघडणार नाही. 
संवाद साधा
आय व्ही.एफचाचणी अपयशी ठरलेल्या ब-याच महिला आपल्या अवतीभवती आहेत, त्या या गोष्टीला कशा सामो-या गेल्या, याबद्दल त्यांचे विचार जाणून घ्या. ऑनलाइन किंवा समोरासमोर भेटून त्यांच्याशी हितगुज साधल्याने आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्यात मदत होईल. तसेच, तुम्हाला प्रोत्साहित करणारे, आणि नवी उमेद देणारे मित्रपरिवार जर असतील, तर त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवा. 
सेल्फ हिलींगचा सराव करा:
आय.व्ही.एफ दरम्यान शरीर बर्याच बदलांमधून गेलेले असते, त्यामुळे आता ते पुर्ववत स्थितीत येणे गरजेचे असते. आय.व्ही.एफ. प्रक्रियेनंतर मासिक पाळी येण्यास काही दिवस लागू शकतात. मासिक पाळी स्वतःहून पुर्ववत होणे आवश्यक आहे. नियोजित मासिक पाळी आपले शरीर सुस्थितीत आहे, हे सुचित करते. एक्युप्रेशर किंवा इतर विश्रांतीतंत्रांचा वापर करून आपले मन आणि शरीर स्वस्थ ठेवा.
दूरदृष्टी योजनांची आखणी करा
गर्भधारण आणि प्रजनन संदर्भातील विविध लेख आणि तज्ञांचे ब्लॉग्स वाचा. आय. व्ही. एफ. प्रक्रीये बद्दल सखोल जाणून घेण्यासाठी बाजारात तसेच नेटवर हजारो पुस्तके आणि साईट्स उपलब्ध आहेत, त्यांचा अभ्यास करा. तसेच, विविध फॉरममध्ये भाग घेऊन संवाद साधा, असे केल्याने तुम्ही अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे, पुढे जाताना भविष्यातील अपयशाचा अंदाज येऊन, चोख पाऊल टाकण्यास मदत होते. 
अपयशासाठी स्वत: ला जबाबदार धरणे पहिले थांबवा
आय.व्ही.एफ.चा निकाल विविध घटकांच्या आधारे लागतो. त्यामुळे, गर्भधारणा होत नसल्याचा संपूर्ण दोष स्वतः वर घेऊ नका.
 
आय.व्ही.एफ. प्रक्रीया पुन्हा केव्हा करावी?
कोणता ही गुणदोष नसताना देखील आय.व्ही.एफ अयशस्वी का झाले, हा प्रश्न संबंधित दांपत्यांना पडत असला तरी, ते पुन्हा ही ट्रीटमेंट घेण्यासाठी स्वत:ला रोखू शकत नाही. 
 
पहिल्या आय.व्ही.एफ. अपयशानंतर तात्काळ दुसऱ्यांदा प्रयत्न करता येत नाही. शरीराला थोडी विश्रांतीची गरज असते. या दरम्यान, आपल्या डॉक्टरांशी तपासणी चेवेळापत्रक तयार करा. आपले शरीर पहिल्यासारखे सामान्य झाल्यावर पुन्हा प्रयत्न करता येतील. दूस-यांदा आय.व्ही.एफ. ला जाताना मनात कोणताच पुर्वग्रह ठेवू नका. तुम्ही जितके सामाजिक आणि मानसिक स्थितीत चांगले असाल तितके ऊत्तम! सकारात्मक विचार कराल तर सर्व काही सुरळीत होते. 
 
आय.व्ही.एफ. चाचणी अयशस्वी झाल्यानंतर पुढे काय करायचे? ही चिंता बहुतांश जोडप्यांना सतावते. अश्यावेळी स्वत: ला दोष देण्या ऐवजी निकालांवर लक्षकेंद्रितकरणे हे ध्येय असले पाहिजे. म्हणून, दीर्घ श्वास घ्या आणि उज्ज्वल भविष्याची अपेक्षा करा.

- DR HRISHIKESH PAI

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रात्री झोपताना पाय कुळतात,जाणून घ्या 9 कारणे