Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थकवा येण्याचे कारण व दूर करण्याचे उपाय जाणून घ्या...

थकवा येण्याचे कारण व दूर करण्याचे उपाय जाणून घ्या...
, गुरूवार, 21 जानेवारी 2021 (15:50 IST)
हिवाळ्यात ऑफिसात मन लागत नाही. तर घरी करमत नाही. ही समस्या प्रत्येकालाच भेळसावत असते. 'काम धेलाभरचं नाही आणि रिकामपण कवडीभरचं नाही' अशीच तुमची गत झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भविष्यात ही समस्या तुमची कायमची डोके दुखी होऊ शकते. त्यावर वेळेतच उपाययोजना करणे आवश्यक आहे. 
 
थंडी जशी-जशी वाढते तसा आपला आळस वाढत असतो. हा आळस म्हणजेच थकवा असतो. शारीरिक व मानसिक अशा दोन प्रकारे थकवा असतो. आराम करून शारीरिक थकान चटकन आपण घालवू शकतो. मात्र मानसिक थकवा घालविण्यासाठी खूप अवधी लागत असतो. 
 
थकवा हा कोणत्या प्रकारचा आहे. हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होत असते. मात्र हा थकावा कशामुळे आला आहे. त्याच्यावर उपाययोजना करणे, हे आपल्यासाठी आवश्यक असते. 
 
झोप लवकर का लागते- 
* जास्त प्रमाणात अंग मेहनत करणे, व्यायाम करणे.
* झोप पूर्ण न होणे.
* अधिक तनावात राहणे. 
* शरीरात रक्त कमी असणे, अशक्तपणा. 
* शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असणे. 
 
थकव्याची लक्षणे-
हिवाळ्यात अधिक थकवा येत असल्याने उत्साह कमी होतो. त्यामुळे थकव्याची लक्षणे ओळखून त्यावर उपाययोजना केली पाहिजे.
 
* कामात मन न लागणे. नकारात्मक विचारामध्ये वाढ होणे.
* अशक्तपणा येणे, दिवसरात्र झोप लागणे. 
 
थकवा दूर करण्याचे उपाय- 
हिवाळयात उन्हात उभे राहिल्याने शरीरात स्फूर्ति येत असते. थकवाही हळू हळू कमी होत असतो. 
* हाताच्या दोन बोटांनी चेहर्‍यावर हलकीशी मालिश करावी. तसे केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. तसेच मन व शरीरावरील ताण कमी होतो. 
* सुगंधित तेलाने शरीराची‍ मालिश केल्यानेही थकवा दूर केला जातो. 
* दररोज योग अथवा व्यायाम करावा मात्र अति व्यायाम केल्याने ही थकवा येतो.
* कमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे.
* तनावमुक्त राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कच्च्या पपईचा शिरा