Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हार्ट अटक शिवाय देखील छातीत वेदना होऊ शकते कारणे जाणून घ्या

हार्ट अटक शिवाय देखील छातीत वेदना होऊ शकते कारणे जाणून घ्या
, मंगळवार, 2 मार्च 2021 (20:36 IST)
छातीत दुखत असल्यावर लोक घाबरून जातात ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे. वृद्ध लोक किंवा आधीच हृदय रोगाने ग्रस्त असलेले लोक इतके अस्वस्थ होतात ते अस्वस्थतेमुळे आजारी पडतात.  
परंतु छातीच्या दुखण्याचे कारण समान नसतात. हे दुखणे बऱ्याच कारणामुळे उद्भवू शकते. परंतु या बाबत निष्काळजीपणा करू नये. हे खूप महत्त्वाचे आहे . बऱ्याच वेळा ऍसिडिटी मुळे किंवा सर्दीमुळे देखील  छातीत दुखणे उद्भवते., वेळच्या वेळी या वर उपचार केले पाहिजे. छातीत दुखण्यामागील कारणे जाणून घेऊ या. 
 
 * फुफ्फुसांचा रोग-
 बऱ्याच वेळा फुफ्फुसांच्या आत सूज येते, या मुळे एकाएकी दुखणे उद्भवते. बऱ्याच वेळा फुफ्फुसांचे आजार निमोनिया आणि दम्याच्या त्रासामुळे देखील वेदना होऊ लागते. हे कारण असल्यास वेदना छातीच्या जवळ होते. सर्दी पडसं असल्यास जास्त वेदना असू शकते. असं झाल्यास त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  
 
* आतील सूज - 
छातीचा अंतर्गत भाग खूप गुंतलेला असतो, अशा परिस्थितीत काही लोकांच्या छातीच्या आतील भागास सूज येते. त्यांना समजत नाही. छातीच्या अंतर्गत भागाची सूज श्वास घेताना वाऱ्याला लागल्यावर छातीमधून वेदना होण्यास सुरुवात होते. वैद्यकीय भाषेत ह्याला प्लुरायटिस असे म्हणतात.ही स्थिती बहुतेक अशा लोकांमध्ये आढळते ज्यांना पूर्वी निमोनियाचा त्रास होता.   
 
* बरगड्या मोडणे- 
कोणत्याही कारणास्तव रिब किंवा बरगड्या मोडतात तेव्हा दुखणे उद्भवते. ज्या लोकांना पाठीच्या कणांचा काही त्रास आहे त्यांना ही वेदना जाणवते. अशा परिस्थितीत दुखणे का उद्भवत आहे असा विचार करून लोक घाबरतात. नसांमध्ये सूज आली असेल तरीही छातीत दुखणे उद्भवू शकते. या वेदना बऱ्याचदा थंड हवामानामुळे होतात. परंतु अचानक वेदना झाल्यास परिस्थिती भयभीत होते. 
 
* ऍसिडिटी -
बहुतेक लोकांना ऍसिडिटी असल्यावर देखील छातीत दुखणे सुरु होते. जेव्हा ऍसिड वरच्या बाजूला येते तेव्हा खरपट ढेकर येतात, छातीत हळू-हळू वेदना होऊ लागते. अशा परिस्थितीत छातीत दुखण्याची चिंता करण्या ऐवजी ऍसिडिटीचा त्वरितच उपचार केला पाहिजे. पोट ठीक झाल्यावर हे दुखणे देखील आपोआप ठीक होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्वचा उजळण्यासाठी डाळिंब आणि साखरेचं स्क्रब वापरा