सुंदर, लांबसडक केस हे स्त्री सौंदर्याचे एक लक्षण मानले जातेच. आता त्यामध्ये नव्याने संशोधन करावे अशी काही परिस्थिती नाही. मात्र, या पाश्चात्य मंडळींना असे चर्वितचर्वण करून एखादा सिद्ध झालेला सिद्धांतच नव्याने मांडण्याची दांडगी हौस असते. आताही या 'संशोधकां'नी म्हटले आहे की पुरुष लांब केस असलेल्या स्त्रियांकडे आकृष्ट होतात. हे केस किमान त्यांच्या खांद्याइतके तरी लांब हवेत!
ज्या महिलांचे केस लांब असतात त्या अधिक स्वस्थ, निरोगी असतात अशी भावना पुरुषांमध्ये निर्माण होते. या लांब केसांना प्रजनन क्षमतेशीही जोडून पाहिले जाते. याबाबतची एक पाहणीही करण्यात आली. त्यावेळी बहुतांश पुरुषांना लांब केस असलेल्या तरुणी अधिक आकर्षक वाटल्याचे दिसून आले.
मनोविज्ञानाशी संबंधित स्कॅडिनेवियाई नावाच्या एका नियतालिकामध्ये या 'नव्या' संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.