Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्यात नाकातून होणारा रक्तस्राव

उन्हाळ्यात नाकातून होणारा रक्तस्राव
, गुरूवार, 16 एप्रिल 2020 (07:38 IST)
नाकातील रक्तस्राव तो सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या तीव्र मोसमामध्ये होतो. सामान्यत: १0-१७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आणि ५0-६५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. उन्हाळ्यामध्ये नाकातील रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे तेथील श्लेष्मल पदार्थ वितळून रक्तस्राव होतो. उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे नाकाच्या अंतर्भागातील श्लेष्मल पदार्थ कोरडा व शुष्क बनतो, त्यामुळे नाकातून रक्तस्राव होण्याचे प्रमाण वाढते.  उन्हाळ्यातील हा रक्तस्राव टाळण्यासाठी कडक उन्हात व कोरड्या हवेत बाहेर जाणे टाळावे. दिवसातून एकदा सौम्य पाण्याचा वाफारा घ्यावा. नाकामध्ये दीर्घकाळ चोंदलेले नाक साफ करणारे औषध वारंवार टाकणे टाळावे. त्याऐवजी नाकाच्या अंतर्भागात सौम्य ओलसर वाफ, नाक साफ करायची वैद्यकीय पिचकारी किंवा नळी यांचा वापर करावा. तसेच नाकाच्या अंतर्भागात कडक पापुद्रे तयार होऊ नयेत म्हणून वॅसलिन सारखे औषध वापरावे.

नाकातील रक्तस्रावाचे प्रमाण हे रक्तदाबाच्या अचानक वाढीमुळे विशेषत: वयोवृद्ध रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे नाकातून सतत रक्तस्राव होत असल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.

तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी उच्च रक्तदाबरोधक औषधे नियमित सेवन केल्यास अशाप्रकारचा नाकातील रक्तस्राव थांबवता येऊ शकतो.

जर तुम्हाला उन्हाळ्यात नाकाच्या रक्तस्रावाचा त्रास झाल्यास तात्काळ कान-नाक-घसा तज्ज्ञाची भेट घ्या.

घरगुती प्राथमिक उपचार म्हणून रक्त थांबवण्यासाठी नाक दाबून ठेवणे, बर्फाचा शेक घेणे असे करता येऊ शकते; परंतु या नंतरही नाकातील रक्तस्राव सतत होत राहिल्यास कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्लॉटिंगचा त्रास असल्यास हे करा...