rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

1 कोटी 44 लाख मुले भारतात लठ्ठ

1 कोटी 44 लाख मुले भारतात लठ्ठ
जगात चीनच्या पाठोपाठ भारतात लठ्ठ मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे स्थूलपणाने निर्माण होणाऱ्या विकारांना ही मुले लहान वयातच बळी पडत असून भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरणार आहे. सर्वाधिक लठ्ठ प्रौढ व्यक्तींची संख्या अमेरिकेत असून दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे.
जगभरात २०० कोटी लहान मुले, युवक आणि प्रौढ व्यक्ती स्थूल देहयष्टीच्या आहेत. स्थौल्य आणि प्रमाणापेक्षा अधिक वजन यामुळे जगभरात विविध विकारांनी ग्रस्त होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. सन २०१५ मध्ये स्थूलपणामुळे होणाऱ्या विकारांमुळे ४० लाख जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ४० टक्के जणांच्या वजन आणि उंचीच्या प्रमाणात (बॉडी मास इंडेक्स) मोठी तफावत असल्याचे आढळून आले.
 
जगभरात सन २०१५ मध्ये झालेल्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल १/३ मृत्यू लठ्ठपणामुळे झाल्याचे संशोधकांनी दाखवून दिले आहे. अशा मरण पावलेल्यांपैकी १० कोटी ८ हजार १८ हजार मुलांचा आणि ६० कोटी प्रौढ व्यक्तींचा बीएमआय ३० पेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. चीनमध्ये १ कोटी ५३ लाख; तर भारतामध्ये १ कोटी ४४ लाख मुले स्थूल आहेत. अमेरिकेत ७ कोटी ९४ लाख प्रौढ लठ्ठ असून हीच संख्या चीनमध्ये ५ कोटी ७३ लाख आहे.
आपल्या वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करणे अथवा त्याबाबत हलगर्जीपणा दाखविणे अयोग्य आहे. त्यामुळे हृदयविकार, कर्करोग, मधुमेह यांच्यासारखे जीवघेणे रोग होऊ शकतात; असे वॊशिंग्टन विद्यापीठातील संशोधक ख्रिस्तोफर मुरे यांनी सांगितले. अनेक स्थूल व्यक्ती वर्षाच्या सुरुवातीला वजन घटविण्याचा संकल्प करतात. मात्र तो केवळ कागदावरच राहतो. तसे न करता वजन घटविण्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढेही ते वाढू न देण्याचा संकल्प अमलात आणणे निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहे; असा इशाराही त्यांनी दिला.
 
सन १९८० पासून ते सन २०१५ पर्यंत जगभरातील १९५ देशात हा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये इतर संशोधनांचा संदर्भ घेऊन बीएमआय आणि कर्करोग यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्नही या अभ्यासात करण्यात आला आहे. सन १९८० पासून जगातील ७० देशांमध्ये लठ्ठपणामध्ये दुप्पट वाढ झाली असून इतर देशांमध्येही हे प्रमाण उल्लेखनीय आहे. स्थूल लहान मुलांची संख्या प्रौढांपेक्षा कमी असली तरी लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचे प्रमाण प्रौढांपेक्षा अधिक असल्याचेही या संशोधनात दिसून आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तेव्हा पाळीत वाळू आणि लाकूड वापरायच्या स्त्रिया