कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यापैकी जे कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकत आहेत त्यांना इतर रोग उद्भवू लागले आहेत. ज्या रुग्णांना मधुमेह झाला नाही, ते सुद्धा पोस्ट कोविडनंतर मधुमेहाच्या आजाराला बळी पडत आहे. कोरोनाचा हा आजार रोखण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत परंतु त्याचा उद्रेक अजूनही सुरू आहे. आता कोविडपासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये रक्त गोठण्यासंबंधीचा रोग आता समोर आला आहे. ज्याला ब्लड क्लॉटिंग किंवा थ्रोम्बोसिस म्हणतात.
हा रोग काय आणि कसा होतो?
तज्ञ आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू शरीरात शिरल्यानंतर सूज येणे सुरू होते. ज्यामुळे हृदय कमकुवत होऊ लागतं. त्याचा थेट परिणाम हृदयाचा ठोकाच्या गतीवर पडतो आणि हळूहळू शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. याला रक्त गोठणे म्हणतात. रक्ताच्या गुठळ्यामुळे, हृदय खूप कमकुवत होतं आणि त्याच्या क्षमतेनुसार कार्य करण्यास सक्षम नसतं, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
कोविड रूग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जमत आहेत?
जागतिक स्तरावर एक संशोधन करण्यात आले आहे ज्यामध्ये कोविड रुग्णांच्या 15 ते 30 टक्के रुग्णांमध्ये हा आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. याला डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणतात. तज्ञांच्या मते हा विषाणू फुफ्फुसांशी तसेच रक्ताशीही संबंधित आहे.
ब्लड क्लॉट्स कुठे तयार होतात?
कोविडवर सतत संशोधनानंतर इतर आजारांवर संशोधन चालू आहे. एका संशोधनात असे दिसून आले आहे की कोविड रूग्णांपैकी जवळजवळ 30 टक्के लोकांना ही समस्या भेडसावत आहे. रक्त पेशी शरीरात आढळतात, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या कुठल्याही भागात तयार होतात.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, कोविडनंतर दुर्मिळ रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका सामान्यपेक्षा 100 पट जास्त असतं.