Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुणधर्म वनौषधींचे

गुणधर्म वनौषधींचे
, शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (16:02 IST)
असंख्य वनस्पतींचा समावेश आपल्या आहारात असतो. यात कोथिंबीर, पुदिना, कोरफड अशा वनस्पतींचा उल्लेख करावा लागेल. या वनस्पतींमधल्या औषधी गुणधर्मांविषयी...
कोरफड औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. विविध प्रकारच्या जखमा, भाजणं, कापणं यावर कोरफडीचा गर प्रभावी ठरतो. कोरफडीमुळे शरीराचा दाह कमी होतो. त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासोबतच इतर त्वचाविकारही कोरफडीच्या वापरामुळे दूर होऊ शकतात. त्वचा, केसांसोबत विविध विकारांमध्येही कोरफड वापरली जाते. अल्सरेटिव्ह कोलायटिस, जुनाट बद्धकोष्ठता, अपचन, पचनसंस्थेशी संबंधित इतर विकार यावरही कोरफड प्रभावी ठरू शकते. कोरफडीचा गरमिश्रित पाणी प्यायल्याने शरीरातले विषारी घटक बाहेर पडायला मदत होते.
कोणत्याही पदार्थांची चव वाढवणारी कोथिंबीरही खूप औषधी आहे. यात फायबर, मॅग्नेशियम, मँगनिज, प्रथिनं आणि लोह असे घटक असतात. यासोबत 'क' जीवनसत्त्व आणि इतर पोषक तत्त्वांनीही कोथिंबीर समृद्ध आहे. कोथिंबिरीमुळे रक्तातल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं. उलटी, मळमळ, पोटदुखी अशा विकारांमध्येही कोथिंबीर लाभदायी ठरू शकते.
कोथिंबिरीमुळे उच्चरक्तदाबावर नियंत्रण मिळवता येतं. मासिक पाळीशी संबंधित विकार यामुळे दूर होऊ शकतात. 
पंकजा देव
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Indian Railways: बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या तयारीत, 20 सप्टेंबरपासून बॅच सुरू होईल