- सुरभि भटेवरा
साथीच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड प्रकरणात दररोज अधिक प्रमाणात नोंद केली जात आहे. मागील वर्षापासून पसरत असलेल्या या आजारामुळे लोकांचे जीवन नरक केले आहे. आता याहून बचावासाठी लसीकरण हा एक मार्ग असल्याचे दिसत आहे. परंतू याबद्दल देखील अनेकांच्या मनात काही प्रश्न आहे. या संदर्भात वेबदुनियाने आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी डॉ. अमित मालाकार यांच्यासोबत चर्चा केली जाणून घ्या काय आहे त्याचे मत-
प्रश्न 1. लसीकरण आवश्यक आहे का?
उत्तर. नक्कीच, जो कोणी लसीस पात्र आहे त्याने लसीकरण करावे. यामुळे कोव्हिड-19 ची सीवियरिटी कमी होईल. जर आपल्याला कोरोना झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची स्थिती निर्माण होणार नाही.
प्रश्न 2. लसीकरणानंतर कोव्हिड होण्याची शक्यता असते का?
उत्तर. होय, लसीकरणानंतर देखील कोव्हिड होऊ शकतं.
प्रश्न 3. लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा डोस कधी घ्यावा?
उत्तर. जर लसीकरणानंतर कोव्हिड झालं तर आपण बरं झाल्यावर एक महिन्याच्या अंतराने दुसरा डोज घेऊ शकता.
प्रश्न 4. कोव्हिड मुक्त झाल्यावर वॅक्सीनेशनची गरज असते का?
उत्तर. होय, कोव्हिड मुक्त झाल्यावरही लसीकरणाची गरज आहे.
प्रश्न 5. लससाठी एखाद्या कंपनीची निवड करणे योग्य आहे का?
उत्तर. नाही, दोन्ही वॅक्सीनची क्षमता समान आहे. दोन्ही अर्थात कोव्हिशिल्ड आणि को-वॅक्सीन सुरक्षित आहे. दोन्ही सरकारद्वारे उपलब्ध करवण्यात येत आहे.
प्रश्न6. वॅक्सीनेशननंतर सावध राहणे गरजेचं आहे?
उत्तर. वॅक्सीनेशननंतरही तेवढीच काळजी घ्यायची आहे. मास्क लावणे आणि सामजिक अंतर पाळणे आवश्यक आहे.
प्रश्न 7. एक डोज पुरेसा आहे?
उत्तर. नाही, हे बूस्टर डोज असतात. दोन डोज घेणे आवश्यक आहे.
प्रश्न 8. दोन्ही डोस समान आहेत का?
उत्तर. होय, दोन्ही डोस समान आहेत. तरी पहिला डोज कोव्हिशिल्डचा घेतला असेल तर दुसरा देखील त्याचा घ्यावा.
प्रश्न 9. लस लावल्यानंतर साइड इफेक्ट्स किती काळ दिसू शकतात?
उत्तर. वॅक्सीन लावल्यानंतर ताप, हात-पाय दुखणे, डोकेदुखी, हे मायनर लक्षणं आहेत. याचा प्रभाव एक किंवा दोन दिवस राहू शकतो.
प्रश्न 10. लस लावल्यानंतर साइड इफेक्ट्स होत नसल्याचं लसीचा परिणाम झाला नाही असे आहे का?
उत्तर. प्रत्येकाचं इम्युनिटी लेव्हल वेगवेगळं असतं. कोणाला साइड इफेक्ट्स जाणवतात कोणालाही नाही. याचा अर्थ असा नव्हे की वॅक्सीन प्रभावी ठरणार नाही. याचा सर्वांवर प्रभाव पडतो.
प्रश्न 11. कोविडच्या उपचारात प्लाझ्मा दिलेल्यांना लस घेतली पाहिजे का?
उत्तर. आजच्या परिस्थितीनुसार, सरकारने ठरविलेल्या वयोगटानुसार प्रत्येकाला लस द्यावी लागेल. जर प्लाझ्मा प्रदाता 45 वर्षांपेक्षा जास्त असेल तर ते सर्व पात्र आहेत.