Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंघोळी दरम्यान तोंड धुवावे का?

आंघोळी दरम्यान तोंड धुवावे का?
, सोमवार, 19 एप्रिल 2021 (09:25 IST)
प्रत्येकाची आंघोळीची पद्धत ठरलेली असते. कोणाची आंघोळ अवघ्या पाच मिनिटांमध्ये उरकते तर काहींना बराच वेळ लागतो. काहीजण आधी केस धुतात तर काही शारीरिक स्वच्छतेनंतर केसांवर पाणी ओततात.

आंघोळीदरम्यान तोंड धुवायचे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आंघोळ करतानाच आपण चेहराही साबणाने किंवा फेसवॉशने धुवून घेतो. असे करणे चुकीचे असल्याचे त्वचा तज्ज्ञांचे मत आहे. आंघोळीकरता वापरले जाणारे पाणी बरेच गरम असल्याने या पाण्याने चेहरा धुवू नये. 
 
शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत चेहर्याची त्वचा नाजूक असते. म्हणूनच गरम पाण्यामुळे ती खराब होऊ शकते. गरम पाण्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, त्वचा लाल होणे अशा समस्या निर्माण होत असल्याने आंघोळीचे पाणी तोंड धुण्यासाठी वापरू नये. पाणी जेवढे गरम तेवढी चेहर्याआची त्वचा कोरडी पडण्याचा धोका जास्त असतो. चेहर्याची त्वचा गरम पाण्याच्या संपर्कात आल्याने पिगेंट्‌स स्रवणचे प्रमाण वाढते. त्वचेचा रंग बदलण्याचा धोकाही असतो. त्वचेचा पाण्याशी  जास्त संपर्क येणे हे सुद्धा आंघोळीदरम्यान तोंड न धुण्याचे महत्त्वाचे कारण म्हणता येईल. आंघोळीचा वेळ कमी करणे गरजेचे आहे. फक्त पाच ते दहा मिनिटात आंघोळ उरकायला हवी. त्यामुळे शक्यतो  बेसिनमध्ये तोंड धुवा. असे केल्याने आंघोळीचा वेळ कमी होतो आणि त्वचेचा पाण्याशी फार संपर्क येत नाही. त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी आंघोळ लवकरात लवकर आटपा. दिवसातून फक्त एकदा कोमट पाण्याचे आंघोळ करा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Watermelon juice : उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायद्याचं