Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

भोजनाचा गंध वाढवू शकतो लठ्ठपणा

food smell can increase weight
अतिखादाडपणामुळे शरीराचे वजन वाढते, हे सगळ्यांनाच माहीत आहे, मात्र अन्न खाल्ल्यामुळेच वजन वाढते, असे नाही तर त्याचा सुगंधसुद्धा तुमच्या आरोग्यावर भारी ठरू शकतो. चांगल्या खाद्यपदार्थांचा दरवळही व्यक्तीची भूक वाढवतो. हा दरवळ लठ्ठपणाचे कारण बनू शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. अमेरिकेतील लॉस एंजेल्समधील सेडर्स सिनाई मेडिक सेंटरच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. या शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, समजा एखाद्या उंदराची हुंगण्याची क्षमता नष्ट केली तर जास्त भोजनही त्याच्या लठ्ठपणासाठी कारण ठरत नाही.
 
दुसरीकडे ज्या उंदरांची हुंगण्याची क्षमता जास्त होते, त्यांचे वजन दुप्पट वेगाने वाढते. या संशोधनात असे दिसून आले की आपण जे खातो, त्याच्या सुंगधाचा आपल्या प्रकृतीवर मोठा परिणाम होतो. या सुगंधशतूनच भोजनातून मिळणार्‍या कॅलरीचा आपले शरीर कसा वापर करेल, हे ठरत असते.
 
या संशोधनाचे प्रमुख सेलीन रोएरा यांनी सांगितले की समजा आण हुंगण्याची क्षमता बदलली तर भोजनातून मिळणार्‍या ऊर्जेप्रती शरीराचे वर्तनही बदलते. संवेदना प्रणाली आपल्या चयापचय प्रक्रियेवर मोठा प्रभाव टाकते. वजन केवळ आपण किती कॅलरी घेतल्या यावर निर्भर नसते, तर शरीराने त्या कॅलरींचा कशाप्रकारे वापर केला यावरही अवलंबून असते. वजनवाढीसाठी कारणीभूत ठरणारीही संपूर्ण प्रक्रिया समजून हेतु हुंगण्याच्या क्षमतेला प्रभावित न करता त्यावर नियंत्रण करता येऊ शकणारी औषधे बनविणे शक्य होईल, असे शास्त्रज्ञशंनी सांगितेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उपवासाचे ढोकळे