Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धू्म्रपानामुळे अनियमित होतात हृदयाचे ठोके

धू्म्रपानामुळे अनियमित होतात हृदयाचे ठोके
, सोमवार, 7 मे 2018 (16:57 IST)
धू्म्रपान आणि मद्यपान करणार्‍या व्यक्तीला आयुष्यभर एट्रियल फायब्रिलेशन (एएफ) नामक आजाराने ग्रस्त होण्याचा धोका असतो. या आजारामध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात, त्यामुळे रुग्ण ह्रदयविकाराचा झटका, पक्षघात, स्मृतिभ्रंश आदींची शिकार ठरू शकतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अध्ययनानुसार, धू्म्रपान व मद्यपानामुळे 55 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये एट्रियल फायब्रिलेशन आजाराचा धोका सुमारे 37 टक्के जास्त असतो. शास्त्रज्ञांनी सांगितले की, आजाराच्या अल्पकाळ धोक्यासोबतच दीर्घकालीन धोक्याचा अंदाज बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे आजाराची जलद ओळख होण्यासोबतच जीवनशैलीमध्ये बदल करून तिला नियंत्रित करणे सोपे जाते. या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी सुमारे 5 हजार लोकांच्या रक्तदाबाची आकडेवारी बॉडी मास इंडेक्स, मधुमेहासोबतच त्याचे धू्म्रपान व मद्यसेवानाची माहिती गोळा करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुखा जाम