Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनालसीकरणानंतर या 5 गोष्टींची काळजी घ्या आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

कोरोनालसीकरणानंतर या 5 गोष्टींची काळजी घ्या आरोग्य मंत्रालयाचा सल्ला
, शुक्रवार, 21 मे 2021 (20:45 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव किती काळ चालू राहील? ही महामारी कधी संपेल? यावर सतत संशोधन होत आहे. परंतु या विषाणूला टाळण्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत - सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, सेनिटायझरचा वापर करणे आणि लसीकरण. लसीकरणाचे काही दुष्परिणाम नक्कीच आहेत, परंतु काही गंभीर दुष्परिणामही समोर येत आहेत ज्यात रक्त साकळण्याची समस्या दिसून येतं आहे.
यासंदर्भात, आरोग्य, कुटुंब आणि कल्याण मंत्रालयाने या लसीच्या दुष्परिणामां विषयी एक सल्ला दिला जात आहे , ज्यामध्ये 20 दिवसांच्या आत रक्त साकळण्याची समस्या होत असल्यास लोकांना लसीकरण केंद्रावर त्वरित तक्रार दाखल करण्यास सांगण्यात येत  आहे. 
 
सांगत आहोत की हा खास सल्ला त्यांच्या साठी आहे ज्यांनी कोव्हीशील्ड लस  घेतली आहे कारण ऍस्ट्रोजेनकाच्या लस ने रक्ताच्या गुठळ्या बनत आहे. अनेक देशांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.  
 
कोव्हीशील्ड लस घेतल्यावर या प्रमुख लक्षणांची काळजी घ्या -
 
* दम लागणे.
 
* श्वास घेण्यास त्रास होणे/छातीत दुखणे.
 
* अंग सुजणे,अंगांना दाबल्यावर वेदना होणे.
 
* ज्या हातावर लस देण्यात आली आहे त्यावर किंवा शरीराच्या इतर अवयवांवर लाल डाग होणे.
 
* उलट्या होणे किंवा पोटात सतत दुखणे.
 
* वारंवार उलट्या होणे.
 
* डोळ्याने अंधुक दिसणे,डोळे दुखणे.
 
थ्रोम्बोसिस म्हणजे काय?
 
थ्रोम्बोसिस म्हणजे रक्त साकळणे. ही समस्या पायात अधिक जाणवते . परंतु जर शरीरात कोठेही रक्त जमण्याची समस्या उद्भवली तर रक्त शरीराच्या इतर भागात हस्तांतरित करण्यास सुरवात होते. रक्ताच्या गुठळ्या साकळण्याने ऑक्सिजन शरीराच्या इतर भागात पोहोचत नाही. यामुळे गंभीर आजार देखील होतो. हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. म्हणून, रक्त साकळण्याला दुर्लक्षित करू नका आणि असे आढळल्यास लसीकरण केंद्रावर त्वरित तक्रार दाखल करा.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाकाळात पनीर खाण्याचे 10 फायदे जाणून घ्या