Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टिप्स: प्रोस्टेट कँन्सर कमी करण्यासाठी काय करावे?

prostate cancer
, सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (21:52 IST)
डॉ. प्रीतम कुमार जैन - वरिष्ठ सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटोलॉजीस, मसिना हॉस्पिटल, मुंबई
प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी निश्चितपणे कोणतीही पद्धत नाही. काही जोखीम घटक अपरिवर्तनीय आहेत जसे की वय, वैयक्तिक इतिहास, कौटुंबिक इतिहास आणि अनुवांशिक पार्श्वभूमी.
तथापि, असे काही अभ्यास आहेत ज्यामध्ये प्रोस्टेट कॅंसर नियंत्रणात असताना धोका कमी करण्यात मदत करू शकतात. 
 
त्यापैकी काही खालीलप्रमाणे टिप्स दिल्या आहेत.
1. निरोगी जीवनशैली
2. नियमित व्यायाम, जसे की दिवसातून 20 मिनिटे, आठवड्यातून 5 दिवस तरी किमान व्यायाम करायला हवा. 
3. लठ्ठपणा टाळा  
4. बॉडी मास इंडेक्स मेंटेन ठेवणे.  
5. फळे आणि भाज्या असलेले समृध्द आहार जेवणे. 
6. अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असलेले समृध्द आहार सेवन करणे. 
7. उच्च दुग्धजन्य पदार्थ आणि कॅल्शियम पदार्थांचे आहारात कमी प्रमाणात समावेश करा. 
8. लाल आणि प्रक्रिया केलेले मांस असलेले आहार टाळा.   
9. काही संशोधनात असे म्हटले आहे की 5 अल्फा रिडक्टेज इनहिबिटर आणि ऍस्पिरिनला प्रतिबंधित करणारी औषधे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करू शकतात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करू शकतात. तथापि, FDA ने आत्तापर्यंत त्यांची शिफारस केलेली नाही.
10. प्रोस्टेट संबंधित समस्येची सुरुवातीची लक्षणे ओळखणे तुम्हाला सतर्क करू शकते. वारंवार लघवी होणे, लघवी अपूर्ण होणे, नॉक्टुरिया यासारखी लक्षणे प्रोस्टेट संबंधित समस्यांची संभाव्य लक्षणे असू शकतात.
11. जर तुम्हाला प्रोस्टेट कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल, तर त्यानंतरच्या पिढीतील सदस्यांना किमान एक दशक आधी प्रोस्टेट कर्करोगाचा धोका असतो. ही अनुवांशिक संवेदनशीलता जाणून घेतल्यास, तुमचे वय वाढत असताना तुम्हाला सतर्क राहावे लागेल.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dinkache Ladoo पौष्टिक डिंकाचे लाडू