Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंब्याचे औषधी वापर

आंब्याचे औषधी वापर
* आंबा आतड्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतो. अमाश्याचा रोगांमध्ये आंबा औषध म्हणून कार्य करतो. 
 
* आंबा खाल्लयाने मलावस्तंभाचा त्रास होत नाही. पिकलेला आंबा पोट साफ करणारा, चरबी वाढविणारा, शक्तिवर्धक आणि उत्साहवर्धक असतो.
 
* एखाद्या रुग्णाचे वजन कमी असेल व त्यामुळे त्याची रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर अशा रुग्णास पिकलेला आंबा व त्यासोबत दूध सकाळ, दुपार, संध्याकाळ असे रोज तीनदा द्यावे, आंबा चोखून खाऊन त्यावर दूध प्यावे.
 
* उन्हाळ्यात जीभेला गोडवा देणारा आंबा आरोग्य प्रकृतीसाठी देखील विशेष लाभदायी असतो. आंब्याच्या सेवनामुळे मेंदू तल्लख होतोच, पण त्याचबरोबर मानवी त्वचेचे आरोग्यदेखील चांगले राहते, असा दावा वैद्यकीय चिकित्सकांनी केला आहे, पण यासाठी चांगल्या दर्जाचे खाणे आवश्यक आहते, अन्यथा कुठल्याही प्रजातीचे आंबे खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामदेखील होऊ शकतात, असे क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनावरून स्पष्ट झाले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कैरीची आंबटगोड चटणी