Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 23 March 2025
webdunia

World Down Syndrome Day 2025: डाउन सिंड्रोम म्हणजे काय? या असाध्य आजाराची लक्षणे जाणून घ्या

World Down Syndrome Day 2025: डाउन सिंड्रोम म्हणजे काय? या असाध्य आजाराची लक्षणे जाणून घ्या
, शुक्रवार, 21 मार्च 2025 (12:41 IST)
World Down Syndrome Day 2025 डाउन सिंड्रोम ही एक अनुवांशिक स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरात 21 व्या गुणसूत्राची अतिरिक्त प्रत असते. हा एक प्रकारचा गुणसूत्र रोग आहे जो व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर परिणाम करतो. जन्मापासूनच कोणत्याही माणसाच्या शरीरात डाऊन सिंड्रोम असतो आणि तो कधीही पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु त्याची लक्षणे समजून घेऊन त्याचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. दरवर्षी 21 मार्च रोजी जागतिक डाउन सिंड्रोम दिन साजरा केला जातो, ज्यामुळे या आजाराबद्दल जागरूकता निर्माण होते आणि त्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या हक्कांसाठी आणि चांगल्या जीवनासाठी उपाय शोधले जातात. या सिंड्रोमशी संबंधित काही गोष्टी तज्ञांकडून जाणून घेऊया.
 
काय आहे Down Syndrome?
पेशी विभाजनाच्या वेळी एखाद्याच्या शरीरात गुणसूत्रांची अतिरिक्त जोडी विकसित झाली तर त्यामुळे बाळामध्ये अनुवांशिक समस्या निर्माण होतात. या अनुवांशिक समस्यांपैकी डाउन सिंड्रोम हा सर्वात सामान्य आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील 21 वे गुणसूत्र सदोष बनते, म्हणजेच त्याची एक अतिरिक्त प्रत आपल्या शरीरात विकसित होते. २१ व्या गुणसूत्रात, दोन गुणसूत्रांच्या जोडीला आणखी एक गुणसूत्र मिळते, ज्यामुळे ते तीन होतात. या स्थितीला ट्रायसोमी 21 म्हणतात.
 
Down Syndrome याने शरीरात काय होते?
डाउन सिंड्रोममुळे व्यक्तीच्या शरीरात कॉग्निटिव्ह हेल्थ प्रॉब्लम्स होऊ शकतात. याने मुलांच्या शारीरिक विकासावर प्रभाव होता, ज्यामुळे चेहर्‍याचा विकास देखील विचित्र दिसू शकतो. जसे डोळे बदामसारखे दिसणे किंवा वाकलेले असणे, कान छोटे, मान लहान इतर.
 
Down Syndrome चे काही संकेत
तथापि तज्ञांच्या मते, डाउन सिंड्रोमची लक्षणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात, परंतु काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:-
मानसिक विकासात विलंब, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची मानसिक क्षमता कमकुवत दिसते. शारीरिक लक्षणांमध्ये डोके आणि मान लहान असणे, डोळ्यांच्या आकारात बदल, स्नायू कमकुवत होणे तसेच मानेच्या त्वचेत जास्त चरबीची उपस्थिती यांचा समावेश आहे.
 या व्यतिरिक्त 
ऐकण्याच्या समस्या, 
दृष्टी समस्या, 
पोटाच्या समस्या, जसे की बद्धकोष्ठता किंवा गॅस, इतर लोकांपेक्षा अधिक प्रमाणात इ.
हेल्थ एक्सपर्ट्सप्रमाणष, यावर कोणताही उपचार नाही परंतू या आजाराची लक्षणे व्यवस्थापित केली जाऊ शकतात. मुलांना त्यांच्या शारीरिक विकासात मदत करण्यासाठी विविध प्रकारच्या उपचारपद्धती दिल्या जातात. मुलांच्या भाषिक विकासाला चालना देण्यासाठी भाषा शिक्षणाच्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात. अशा मुलांच्या शिक्षणासाठी विशेष शैक्षणिक संस्था विकसित करण्यात आल्या आहेत.
 
World Down Syndrome Day चे महत्व
दरवर्षी 21 मार्च रोजी साजरा केला जाणारा जागतिक डाउन सिंड्रोम दिन हा या समुदायातील लोकांसाठी डाउन सिंड्रोमबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, पीडितांच्या हक्कांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक खास दिवस आहे. काही वैद्यकीय अहवाल असे सूचित करतात की जगातील प्रत्येक 800 मुलांपैकी 1 मुलाला ही समस्या असू शकते. भारतात दरवर्षी 25,000 ते 30,000 मुले डाउन सिंड्रोम घेऊन जन्माला येतात. 
 
Disclaimer: हा लेख केवळ माहिती प्रदान करण्याच्या उद्देशाने दिला जात आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी, कृपया तज्ञांचा सल्ला घ्या. वेबदुनिया द्वारे माहितीचा दावा केला जात नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Poetry Day 2025: जागतिक कविता दिन विशेष कविता