वर्तमानामध्ये मोबाइल शिवाय वावरण्याची कल्पनादेखील करणे अशक्य आहे. पण आम्ही याला जर्म फ्री करण्यासाठी काय करतो?
एका संशोधनाप्रमाणे आमचा फोन टॉयलेट सीटपेक्षा जास्त घाण असतो. आमच्या फोनमध्ये इतके बॅक्टीरिया असतात ज्याचा परिणाम आमच्या कुटुंबावर पडू शकतो. पण आम्ही या बाजूचा कधी विचारच करत नाही. पाहू काय कारण आहेत ज्यामुळे आमचा फोन घाण होत असतो.
जेवताना किंवा जेवण झाल्याबरोबर आम्ही हातात फोन घेतो ज्याने लहान अन्नकण त्याला चिटकून जातात. आणि बॅक्टीरिया उत्पन्न करतात.
वॉशरूम किंवा जिमहून आल्यानंतरही लगेच आम्ही फोन वापरतो. याने तिथून चिटकून आलेले जर्म फोनवर चिटकतात.
पब्लिक ट्रांसपोर्टमध्ये आमच्या हातात सतत फोन असतो जिथे सर्वाधिक प्रमाणात बॅक्टीरिया असतात.
घाम आलेल्या हाताने जेव्हा आपण फोन चालवतो तेव्हा स्क्रीनवर बॅक्टीरिया पसरतात.
पाळीव जनावरांबरोबर खेळल्यानंतर हात धुतल्याविना फोन वापरण्याने जर्म ट्रान्स्फर होतात.
फोन टेबल, सोफा किंवा फरशीवर ठेवण्याने बॅक्टीरिया फोनवर चिटकून जातात.
वरील गोष्टींकडे लक्ष देऊन मोबाइल वापरताना हात स्वच्छ असले पाहिजे याची काळजी बाळगावी. ज्याने मोबाइलवरही बॅक्टीरिया नसणार आणि त्याने आमचे हात देखील बॅक्टीरिया मुक्त राहतील.