'फळे' ही आपल्याला होत असलेल्या आजारांना प्रतिबंध करीत असतात. एवढेच नाही तर आजारांनंतर शरीराची झालेली झीज ही ते भरपूर प्रमाणात खाल्याने भरून निघत असते. फळांमध्ये विविध पोष्टीक घटक असतात. त्यांच्यामुळे हे शक्य होत असते. अन्नपदार्थांचे व्यवस्थीतरित्या पचन होण्यासाठी त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असायला हवे असते आणि ते फळांमध्ये निसर्गतःच असते. त्यामुळे ते खाल्याने लवकर पचतात. ते आपल्या आरोग्यासाठीही उत्तम असतात.
फळांतील शर्करेचे ज्वलन शरीरात लवकर होते आणि या क्रियेत निर्माण होणारी द्रव्ये शरीराला त्रासदायक नसतात. या तुलनेत मेद आणि प्रथिनांचे शरीराला आवश्यक असलेल्या ऊर्जेत रूपांतर करणे अधिक गुंतागुंतीचे असते. या प्रक्रियेत निर्माण होणारी रसायने शरीराला त्रासदायक ठरू शकतात. प्रथिनांची निर्मिती अमायनो ऍसीडस्पासून होते. आपल्या शरीरात एकूण 20 वेगवेगळ्या अमायनो ऍसीडस्चा वापर केला जातो. त्यापैकी आठ अमायनो ऍसीडस् शरीराला अत्यावश्यक असतात. केळ्यासारख्या अनेक फळांमध्ये ही सर्व अमायनो ऍसीडस् असतात.