चॉकलेट कोणाला आवडत नाही? लहानापांसून थोरामोठय़ांपर्यंत चॉकलेट आवडीने खातात. मात्र दातांवर परिणाम होऊ नये यासाठी काहीजण चॉकलेट खात नाहीत. मात्र तुम्हाला माहीत आहे का चॉकलेट खाण्याचेही अनेक आश्चर्यकारक फायदेही आहेत.
तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर - तणाव कमी करण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो.
उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते. कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंटस् स्वास्थ् चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात.
हृदयासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते. चॉकलेट खाण्याने व्यक्तीचा मूड सुधारतो. कोकोच्या सेवनाने थकवा कमी होण्यास मदत होते.
वजन घटवण्यात गुणकारी- कॅलिफोर्नियाच्या सॅन डिगो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार नियमितपणे चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होण्यात मदत होते. वैज्ञानिकांनुसार चॉकलेटमधील कोको फ्लॅवनॉल वाढत्या वयासंबंधित आजारांना दूर ठेवते. अमेरिकेच्या संशोधनानुसार, रोज हॉट चॉकलेटचे दोन कप सेवन केल्यास मानसिक स्वास्थ् चांगले राहते. तसेच स्मरणशक्तीही वाढते.