Article Marathi Health Article %e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87 %e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%ab%e0%a4%b3%e0%a5%87 %e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95 109092100049_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ताजे दिसणारी फळे धोकेदायक

ताजे दिसणारी फळे
ND
ND
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव व नवरात्रौत्सव येत असतात. या महिन्यात लोक व्रत (उपवास) करत असतात. त्यामुळे ताजे व चमकदार दिसणारी परदेशी फळे बाजारात मोठ्या प्रमाणात येत असतात. फळे सेवन करून लोक उपवासाचा फराळ करतात. ताजे फळे सेवन केल्याने शरीरास विटॅमिन्स मिळतील, असे त्यांना वाटत असते. परंतू ताजे व चमकदार दिसणारी फळे आपल्या आरोग्यास नुकसान देणारी असतात. हे एक संशोधनात सिध्द झाले आहे.

अपोलोचे गेस्ट्रोएन्ड्रोलॉजिस्ट डॉ. देवेंद्र सिंग यांनी दिलेली माहिती अशी की, फळांना पॉलिश केले जात असते. त्यामुळे ते ताजे व चमकदार दिसतात. अशी फळे सेवन करणारी व्यक्ती कावीळीची शिकार होत असते. उपचारानंतर काही दिवसात त्यांना बरे वाटते परंतू त्यांना पोट दुखीचा आजार लागतो. अशा द‍िवसांमध्ये काळजी घेणे हाच या आजारापासून वाचण्यासाठी प्रथोमोपचार आहे.

बेमोसमी फळे खाणे टाळावीत-
बेमोसमी फळे खाणे टाळावीत तसेच फळे खरेदी करताना नेहमी एकाच दुकानदाराकडून ती घ्यावीत. त्याचीकडून तुमची दिशाभूल होणार नाही. परंतू दुसर्‍या दुकानदाराकडून फळे खरेदी करताना ती चांगली पारखून घ्यावीत. काही फळांना केमिकल्सद्वारे पिकविली जात असतात. त्यामुळे फळे खाण्याआधी त्यांना पाण्याने चांगले स्वच्छ करून घ्यावीत.

तब्बेत कमावण्याच्या नादात अतिप्रमाणात फळे सेवन करणे आरोग्यास नुकदासदायी ठरत असते. दुकानदार फळे ताजे व चमकदार दिसावेत म्हणून त्यांना मेन व केमिकल्स लावून ठेवत असतात. अशी केमिकल्सयुक्त फळ खाल्याने अल्सर तसेच पचनक्रियेसंबंधित आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'पॉलिशिंग' काय असते?
फळे जास्त दिवस टिकावीत म्हणून त्यांच्यावर मेन किंवा केमिकल्स लावले जाते. त्यामुळे पिकलेल्या फळांना वरच्या बाजूने वातावरणाचा परिणाम होत नाही. परंतु फळे आतुन सडत असतात. जी फळे अधिका काळ टिकणारी नसतात. त्यांच्याबाबतीत केमिकल व मेन लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. द्राक्षे, केळी व सफरचंद आदी फळे ताजी दिसत असली तरी आत मा‍त्र खराब झालेली असतात.

फळाच्या साली काढाव्यात-
खरे सत्व तर फळाच्या सालट्यात असते. त्यामुळे काही लोक फळे सोलून खात नाहीत. मात्र काही लोकांचे म्हणणे आहे की, सफरचंद व नाशपत्ती सारख्या फळांची सालटे काढून खावीत. सालटे काढून न खाल्याने अल्सर व पचनक्रियेसंबंधित आजार उद्‍भवतात.

पॉलिशिंग केवळ फळावरच नाही तर पाले भाज्यांवर ही केले जात असते. बाजारात दिसणारे टोमॅटो, काकडी, दुधीभोपळा, मोठी वांगी या सारख्या भाज्यांवर पॉलिश केलेली असते. अशा भाज्या खरेदी करण्‍यापूर्वी त्या चांगल्या आहे किंवा नाहीत हे तपासून घ्यावात. नाही तर घरात विकत आजार घेऊन याल.

Share this Story:

Follow Webdunia marathi