Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...

शरीरात रक्ताची कमी आहे मग हे करा ...
काही जणांना दम लागणे, कमजोरी वाटणे, थकवा जाणवणे अशा विविध समस्या असतात. या सर्व समस्या शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे होत असते. ही कमतरता कशी भरून काढता येईल त्याच्यावर आधारित काही टिप्स..
* एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नियमित प्यावा. 
 
* सफरचंदाच्या ज्यूसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावे. या मिश्रणात लोह तत्त्व जास्त असते. 
 
* २ चमचे तीळ २ तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. पाणी गाळून तिळाची पेस्ट करून घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातून दोन वेळेस हे 
 
मिश्रण खावे. त्यामुळेही रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. 
 
* शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा. 
 
* दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा. 
 
* चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा. 
 
* दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप समान मात्रामध्ये घेऊन चहा तयार करून घ्या. 
 
* शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी अंकुरित धान्याचे सेवन करावे. 
 
* मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, यामुळेही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. 
 
* सोयाबीन आयर्न आणि व्हिटॅमिनयुक्त असते. त्याचे सेवन केल्यास तो फॅटसह जास्त प्रमाणात आयर्न मिळवण्यास मदत करतो. 
 
* नियमित बीटचे सेवन केल्यास रक्त वाढण्यास मदत होते. 
 
* टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे शरीराला खूप मदत मिळते. 
 
अशा सर्व घरगुती टिप्सचा वापर केल्यास तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल व तुम्हाला निरोगी राहण्यास मदत मिळेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्हालाही ऑफिसमध्ये झोप येते का ?