Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हृदयशस्त्रक्रिया टाळण्यासाठी योगसाधना!

हृदयशस्त्रक्रिया टाळण्यासाठी योगसाधना!

संदीप पारोळेकर

ND
ND
'हृदयविकार' हा शब्द जरी उच्चारला अथवा ऐकला असता हृदयाचा ठोका चुकतो की काय, अशी आपली अवस्था होते. गेल्या काही वर्षांपसून 'बायपास' व 'एन्जोओप्लास्टी' करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र आता हृदयशस्त्रक्रिया टाळण्यास 'योगाभ्यास' हे एक वरदान ठरले आहे. आपल्या शरीराला योग्य आहार व विहरासह योगाभ्यासाची ही आवश्यकता असते.

त्यांना 'बायपास' सांगितली आहे, आजच त्यांची 'एन्जोओप्लास्टी' करून आलो, अशी काही विधाने आज प्रत्येक घरातून ऐकायला मिळत आहेत. आपल्या शरीरातील अतिशय नाजूक अवयव म्हणजे हृदय. या नाजूक अवयवला दुखापत झाली म्हणजे फारच अवघड होऊन बसते. ज्याप्रमाणे वाहनाला इंजिन बसविलेले असते. त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या शरीरात धक... धक... करणारे इंजिन अर्थात हृदय असते. गाडीचे इंजिन उतरविल्यावर मॅकॅनिकला मोठ्या प्रमाणात पैसा मोजावे लागतात. अगदी त्याचप्रमाणे हृदयविकार म्हणजे लाखो रूपये असे जणू समीकरणच झाले आहे.

आज तर दवाखान्यांचे रूपांतर मोठ्या मॉलमध्ये झाले आहे. एवढेच नाही तर हृदयशस्त्रक्रिया झाल्यानंतरही 'नो गॅरंटी' असे सांगून डॉक्टर चायना मार्केटसारखे नियम सांगताना दिसतात.

हृदयशस्त्रक्रिया टाळण्यासाठी भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगाभ्यास आज वरदान ठरला आहे. योगाभ्यास करून हृदयतविकार बरा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
webdunia
PR
PR


हृदयाच्यामाध्यमातून आपल्या शरीरातील इतर अवयवांना रक्तवाहिण्यांद्वारे प्राणवायू युक्त रक्तपुरवठा केला जात असतो. एखाद्या वेळेस रक्त पुरवठा करण्याच्या कामात अळथडा निर्माण होत असतो. ही यंत्रना बंद पडते अर्थात हृदयावर दाब पडतो व 'हार्टअटॅक' येतो. परंतु नियमित योगसाधनेने हा 'हार्ट अटॅक', भविष्यातील 'बायपास' प्रसंगी मृत्यु ही टाळता येऊ शकते. तसेच हृदयविकार आपल्या जवळ न फडक्यासाठीही योगाभ्यास रामबाण आहे. नियमित योगसाधना करणे हा प्रत्येकाने नित्यक्रम आखुन घेणे गरजेचे झाले आहे.

उच्च रक्‍तदाब, मधुमेह, स्थूलपणा, रक्‍तात वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण, स्निग्ध पदार्थांचा अतिरेक, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, ताणतणाव इत्यादी कारणे हृदयविकाराच्या पाठीमागे असतात. योगाभ्यास सुरू केल्यानंतर आपल्याला जडलेले व्यसन व इतर व्यधी ही हळूहळू कमी होतात.

ब्रह्ममुद्रा, नमनमुद्रा, योगमुद्रा, पर्वतासन, प्रार्थना, गायत्री मंत्र, दीर्घश्‍वसन, शरीर सैल सोडणे, कपालभाती, कटीवक्र स्थितीतील कपालभाती, उज्जयी, भस्रा, भ्रामरी, प्राणाकर्षण क्रिया, ॐकार, लघुलहरी, ध्यान, शीतकारी, शीतली, वायूसार, मत्स्यासनात कपालभाती, उज्जयी आणि भस्रा, अर्धमच्छिंद्रासन, श्‍वानासन, मार्जारासन, हृदयस्तंभासन, दहा उठाबशा, दररोज अर्था ते एक किमी चालणे, ज्योती त्राटक, शवासन असा योगाभ्यास योगप्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने केल्यास हृदयविकार कायम बरा होऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi